छोट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर हैं' ही मालिका दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. अतर व्यक्तिरेखांप्रमाणे विभूती नारायण मिश्राही भूमिकाही रसिकांची प्रचंड आवडती आहे.

या मालिकेत दिवसागणिक येणारे ट्विस्ट आणि रंजक कथानक यामुळे मालिका लोकप्रिय ठरली आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. यापैकी एक खास आणि विशेष व्यक्तीरेखा म्हणजे विभूती नारायण. त्याची दरवेळेस काही ना काही फजिती होते आणि त्याची फजिती रसिकांना विशेष भावते. प्रत्येकजण त्यांच्या दमदार अभिनयाचा चाहता आहे. पण, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की विभूती नारायण मिश्रा उर्फ आसिफ शेख, यांना 24 वर्षीय मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा आहे.

विभूती नारायण मिश्रा ऊर्फ आसिफ शेख यांचे वय 50 च्या आसपास आहे. भाभी जी घर पर है शोमध्ये अनिता भाभी आणि विभूती नारायण मिश्रा यांचे पात्र सर्वांच्याच पसंतीस पात्र ठरते.  या शोमध्ये सौम्या टंडनच्या जागी नेहा पेंडसे आता विभूती नारायण मिश्रा यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

शोमध्ये विभूती नारायणचा थोडा फ्लर्टी अंदाज दाखवण्यात आला आहे. त्यामुळे तो अंगुरी भाभीवर लट्टु होणाना दिसतो. विभूती नारायण म्हणजेच आसिफ ख-या आयुष्यात फार वेगळे आहेत.आसिफ शेखची ख-या आयुष्यातली पत्नी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. खासगी आणि वैयक्तीक जीवनही तितकंच सुंदर आहे. त्याच्या वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची पत्नी  असल्याचे आसिफ सांगतात.

पत्नीचे नाव जेबा शेख आहे. आसिफ आणि जेबाचे लग्न होऊन 25 वर्षाहून अधिक झाले आहे. जेबा या अभिनयाशी काहीह संबंध नाही. जेबा गृहिणी आहेत. आसिफ शेख 1986 पासून अभिनयक्षेत्रात काम करत आहेत. येस बॉस, ये चंदा कानून है और चिड़िया घर यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bhabhi ji ghar per hain Vibhuti Narayan real wife and family here is detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.