'जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी..', 'आई कुठे काय करते'मधील अनघाने शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:11 PM2021-07-21T15:11:24+5:302021-07-21T15:12:05+5:30

अनघा उर्फ अश्विनी महांगडेने खेड- शिवापूर टोल नाका येथे आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

'Beyond caste, religion, gender, only humanity should be protected ..'Aai Kuthe Kay Karte fame Anagha Aka Ashvini Mahangade shared an experience | 'जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी..', 'आई कुठे काय करते'मधील अनघाने शेअर केला अनुभव

'जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी..', 'आई कुठे काय करते'मधील अनघाने शेअर केला अनुभव

Next

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. अश्विनी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर करत तिला एका ठिकाणी आलेला अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर दोन फोटोंसह एक संभाषण शेअर केले आहे. तिने लिहिले की, स्थळ - खेड- शिवापूर टोल नाका,  समोरून - ही सेम राणूआक्कांसारखी दिसतेय न. सज्जू - आहो त्याच आहेत. आणि मग फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम.


तिने पुढे या पोस्टमध्ये लिहिले की,  आडनावांवरून जात समजावी एवढी मोठी अजून झाले नाही. पण चेहऱ्यावरून स्वभाव समजेल एवढी नक्कीच झालेय. जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी हे नानांनी शिकवले. आणि तसेही आमचे नाते कलाकार आणि रसिक माय-बाप हे आहेच की.


या फोटोत अश्विनीला खेड- शिवापूर टोल नाका येथे काही किन्नरांनी ओळखले आणि मग अभिनेत्रीने देखील त्यांची विचारपूस केली. त्यांच्यासोबत फोटो काढले. तिथे तिला आलेला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला. अश्विनीच्या या पोस्टला खूप पसंती मिळते आहे. तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.


अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. याशिवाय तिने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत राणू आक्काची भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. तसेच तिने अस्मिता मालिकेतही काम केले आहे. टपाल आणि बॉईज या सिनेमातही अश्विनी झळकली आहे. ती एक उत्तम अभिनेत्रीसोबत सामाजिक कार्य करताना दिसते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Beyond caste, religion, gender, only humanity should be protected ..'Aai Kuthe Kay Karte fame Anagha Aka Ashvini Mahangade shared an experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app