Balika vadhu star surekha sikri is not responding well to the treatment | 'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी यांची प्रकृती खालवली, उपचारांना प्रतिसाद देणं बंद

'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी यांची प्रकृती खालवली, उपचारांना प्रतिसाद देणं बंद

टीव्ही मालिका 'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल केले आहे. सुरेखा यांना मंगळवारी मुंबईतल्या क्रीटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या 36 तासांपासून त्यांच्या आयसीयूत उपचार सुरु आहे. मात्र त्या औषधांना प्रतिसाद देत नसल्याचे कळतेय. 

प्रकृती खालवली
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सुरेखा डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितले, ब्रेन स्ट्रोकमुळे सुरेखा यांच्या ब्लडमध्ये क्लोट झाले आहेत यामुळे त्यांच्या तब्येत आणखी खालवली आहे. औषधांच्या मदतीने हे ब्लड क्लोट काढून टाकण्याचा डॉक्टरांचा विचार आहे. याशिवाय सुरेखा सीकरी यांच्या फुफ्फुसात जमा झालेल्या पाण्याचा तपासणी डॉक्टर करणार आहेत.

सुरेखा सीकरी यांच्या तब्येत बिघडताच बॉलिवूड स्टार तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता गजराज राव आणि  'बधाई हो' चित्रपट दिग्दर्शक अमित शर्मा यांनी सुरेखा यांना मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. दोघे वळोवेळी त्यांच्या तब्येतीची चौकशी देखील करतायेत. सुरेखा यांना याआधी त्यांना 2018 ब्रेन स्ट्रोक आला होता. शूटिंग दरम्यान त्या पडल्या होता. त्यानंतर तिच्यावर काही काळ उपचार केले गेले आणि त्या हळू हळू बऱ्या झाल्या.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Balika vadhu star surekha sikri is not responding well to the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.