ठळक मुद्दे2011 मध्ये ‘सारेगामा लिटील चॅम्स’चा विजेता अजमत त्यावेळी केवळ 10 वर्षांचा होता.

टीव्हीवरच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये येण्यासाठी स्पर्धक प्रचंड कष्ट घेतात. यापैकी काही स्पर्धकांचे आयुष्य बदलते आणि ते एका रात्रीत स्टार बनतात. यातलेही अगदी मोजके या ग्लॅमरस दुनियेत टिकतात. उरलेले बरेच जण आले तसे गायब होतात. एक स्पर्धक असाच एक. अजमत हुसैन असे त्याचे नाव.
2011 मध्ये ‘सारेगामा लिटील चॅम्स’चा विजेता अजमत त्यावेळी केवळ 10 वर्षांचा होता.‘ सारेगामा लिटील चॅम्स’ या शोच्या ग्रँण्ड फिनालेला शाहरूख खानने हजेरी लावली होती आणि त्याने अजमतला आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते.

कैलाश खेर, अदनान सामी, जावेद अली या शोचे जज होते. 2011 मध्ये ‘सारेगामा लिटील चॅम्स’मध्ये दिसलेला अजमत तब्बल 8 वर्षांनंतर ‘इंडियन आयडल 11’चे ऑडिशन देण्यासाठी पोहोचला. यावेळी त्याने जे काही खुलासे केलेत ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. सध्या त्याचा ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
होय, आज अजमतचे वय 18 वर्षे आहे. अजमत ‘इंडियन आयडल 11’च्या ऑडिशनसाठी येतो आणि शोची जज नेहा कक्कर त्याला लगेच ओळखते. तू अजमत आहेस ना? असे ती त्याला विचारते. यावर अजमत होकारार्थी उत्तर देतो आणि मी 2011 मध्ये रिअ‍ॅलिटी शो जिंकला होता, असे सांगतो. मग गेली 8 वर्षे काय करतोय? असे  विशाल ददलानी त्याला विचारतो. यावर अजमत जे काही सांगतो, ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. होय, तो सांगतो, ‘मी अनेक शो केले. पैसे कमावलेत. पण त्या पैशात घरच्या गरजा भागत नव्हत्या.

याचदरम्यान वाढत्या वयातील शारिरीक बदलांमुळे  माझा आवाज बदलला. माझा बदललेला आवाज ऐकून लोकांना तो आवडेनासा झाला. मी अतिशय खराब गातो, असे लोक मला म्हणू लागले. मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि गाणे सोडले. 3 वर्षांपूर्वी मी गाणे सोडले. यादरम्यान मी काही वाईट लोकांच्या संपर्कात आलो आणि व्यसनांच्या आहारी गेला. मला माझ्या आवाजाचाच तिरस्कार वाटू लागला. मागच्या सीझनमध्ये मी सलमान अलीला बघितले आणि त्याच प्रेरणेने मी पुन्हा गाण्याचा निर्णय घेतला. मला आता पुन्हा नव्याने माझी ओळख निर्माण करायची आहे.’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: azmat hussain indian idol audition told his struggling story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.