Avinash Sachdev wondered why Shweta Tiwari did not live any longer? What is the reason behind this? | अविनाश सचदेवला का वाटते रोमान्स करण्याचे श्वेता तिवारीचे आता वय राहिले नाही?जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?
अविनाश सचदेवला का वाटते रोमान्स करण्याचे श्वेता तिवारीचे आता वय राहिले नाही?जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?
आजही 'कसौटी जिंदगी की' ही मालिका आठवताच डोळ्यासमोर श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी राहते. या मालिकेतून तीन रसिकांचे तुफान मनोरंजन केले. ही मालिका बंद झाल्यानंतर वेगवेळ्या टीव्ही शोच्या माध्यमातून श्वेताची झलक पाहायला मिळाली. त्यानंतर तीने लग्न केले आणि पुन्हा एकदा संसारात व्यस्त झाली. गेल्याच वर्षी श्वेताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ आता मोठं होतंय त्यामुळे पुन्हा एकदा श्वेताने मालिका करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती  ‘इंतकाम एक मासूम का’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार होती, पण ऐनवेळी तिच्या जागी मेघा गुप्ताची निवड करण्यात आल्याने नव्या चर्चेला उधाण आलंय. सूत्रांनी सांगितले की मालिकेचा नायक अविनाश सचदेवच्या सुचनेवरून मेघा गुप्ताची निवड करण्यात आली. मात्र अविनाशने श्वेता तिवारीच्या जागी मेघाची निवड करण्यास सांगितले यालाही खास कारण आहे. “फार पूर्वी अविनाश आणि श्वेता यांच्यात काही कारणांवरून खटके उडाले होते. त्याला जेव्हा समजलं की या मालिकेत त्याची नायिका श्वेता तिवारी आहे, तेव्हा त्याने तिच्याबरोबर काम करण्यास नकार दिला. त्याने सांगितलं की श्वेता आता पूर्वीपेक्षा वयस्कर दिसते आणि त्यामुळे पडद्यावर तिच्याबरोबर रोमँटीक भूमिका साकारण्याचा मी विचार देखील करू शकत नाही.” यासंदर्भात अविनाशकडे विचारणा केली असता तो म्हणाला, “मी तर श्वेता तिवारीला ओळखतही नाही. आमची कधीच ओळख करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मला तिच्याबरोबर काम करण्यात कसली अडचण येणार होती? काहीतरीच विचारणा आहे ही.”श्वेतानेही सांगितले की ती अविनाशला ओळखत नाही. तसेच या मालिकेत भूमिका न करण्याचा निर्णय तिचा स्वत:चा आहे. “अविनाश सचदेव कसा दिसतो, हे पाहण्यासाठी मी गूगलवर शोध घेतला. तेव्हा मला जाणवले की त्याने 'छोटी बहू' मालिकेत भूमिका साकारली होती. अनुराधा सरीन ही माझी गेल्या 12 वर्षांपासूनची खास मैत्रीण आहे. तिने मला या मालिकेची पटकथा ऐकविली; परंतु ही नकारात्मक भूमिका असल्याने मी तिला नकार दिला. ती मला हवे तितके मानधन देण्यास आणि माझ्या सोयीच्या वेळेनुसार चित्रीकरण करण्यासही तयार होती,मात्र मला नकारात्मक भूमिका साकाररून माझ्या चाहत्यांनाही नाराज करायचे नाहीय. त्यामुळे ही भूमिका करण्यास नकार दिल्याचे श्वेताने सांगितले. Web Title: Avinash Sachdev wondered why Shweta Tiwari did not live any longer? What is the reason behind this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.