ठळक मुद्देरात्रीस खेळ चालेच्या दोन्ही भागात दत्ता अतिशय चांगला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. एवढेच नव्हे तर अण्णा दारू प्यायचे याचा दत्ताला राग यायचा.

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेच्या तिसऱ्या सीझनने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत एकेक पात्रांची एन्ट्री होत आहेत. मालिकेत दत्ताची एंट्री झाल्यापासून तो सतत दारू का पितो असा प्रश्न या मालिकेच्या चाहत्यांना पडला आहे.

रात्रीस खेळ चालेच्या दोन्ही भागात दत्ता अतिशय चांगला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. एवढेच नव्हे तर अण्णा दारू प्यायचे याचा दत्ताला राग यायचा. पण अचानक दत्ताला काय झाले, दत्ता दारू का प्यायला लागला अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आता दत्ताची वाड्यात एंट्री झाली असून दत्ताच्या बाबतीतील अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

अण्णा नाईकांच्या पापांमुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची पुरती वाट लागली आहे. अतृप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदते घर रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक सगळ्या संकटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा या मालिकेत पाहायला मिळत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: audience will get to know about datta in ratris khel chale 3 soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.