‘हे माँ.. माताजी...’ हा डायलॉग कुठे ऐकल्यासारखा वाटतोय? थोडा विचार केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, हा डायलॉग तर दयाबेनचा आहे...होय, छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेनचा. तुम्हाला ठाऊक आहे का, तिने ऐश्वर्या रॉय बच्चनसोबत काम केलं आहे. कुठला चित्रपट? तर होय, ‘जोधा अकबर’ चित्रपटात तिने काम केल्याचं कळतंय.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी दिशा वकानी आहे. तिने ऐश्वर्या रॉय आणि हृतिक रोशन यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. या चित्रपटात दिशाने ऐश्वर्या म्हणजेच चित्रपटातील जोधाच्या मैत्रिणीचे पात्र साकारले होते. तिचे चित्रपटात नाव माधवी आहे. हृतिक आणि ऐश्वर्याच्या लग्नानंतर माधवी ऐश्वर्यासोबत तिच्या सासरी जाते.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया बेन आणि जेठालाल या दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचे दिसत आहे. दयाबेनच्या बोलण्याची अनोखी स्टाईल आणि अभिनयाने तिने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. जवळपास ११ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या लॉकडाउनमध्ये दिशा मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The artist from 'Taarak Mehta serial..' has worked with Aishwarya Rai !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.