ठळक मुद्देअर्चना मस्करीत म्हणाली की, कपिलला या कार्यक्रमात काम करण्यासाठी इतका पैसा मिळतो की आमच्यासाठी खूपच कमी रक्कम शिल्लक राहाते. 

द कपिल शर्मा शो ला प्रेक्षकांचे नेहमीच प्रेम मिळते. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा कपिल शर्मा असून त्याने त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. कपिलला या कार्यक्रमात काम करण्यासाठी किती मानधन मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? द कपिल शर्मा शोमधील कपिलची सहकलाकार अर्चना पुरण सिंगनेच त्याच्या कमाईचा आकडा नुकताच या कार्यक्रमात सांगितला आहे. हा आकडा ऐकल्यावर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अजय देवगण आणि काजोल यांना देखील प्रचंड धक्का बसला...

अजय देवगण आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेल्या तान्हाजी': द अनसंग वॉरियर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने काजोल आणि अजय देवगण यांनी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कपिलच्या टीमने अजय आणि काजोलसोबत प्रचंड मजा मस्ती केली. या कार्यक्रमात अजय देवगण कपिलची टर उडवताना दिसला. अजयने कपिलची टर उडवण्याची एकही संधी सोडली नाही. या कार्यक्रमात अजय कपिलला चिडवत असतानाच अर्चनाने या कार्यक्रमाचा हिस्सा बनण्यासाठी कपिलला किती पैसे मिळतात याविषयी सांगितले. अर्चना मस्करीत म्हणाली की, कपिलला या कार्यक्रमात काम करण्यासाठी इतका पैसा मिळतो की आमच्यासाठी खूपच कमी रक्कम शिल्लक राहाते. 

अर्चनाचे हे बोलणे ऐकल्यानंतर उपस्थितांना त्यांचे हसू आवरले नाही. त्यावर कपिल म्हणाला, मला आता एक मुलगी आहे. घर चालवण्यासाठी मला पैसे कमवावेच लागतात. 

Web Title: Archana Puran Singh on what Kapil Sharma earns for the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.