छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा' शोमध्ये अभिनेत्री अर्चना पूरन सिंग प्रेक्षकांना हसवताना दिसते. या शोमध्ये बऱ्याचदा प्रेक्षकांशी संवाद साधताना मजेशरी किस्से व अनुभव शेअर करत असते. नुकताच तिने शोमध्ये एक मोठा खुलासा केला आहे. 


अर्चना पूरन सिंगने 'द कपिल शर्मा शो'मध्ये एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, एकदा रात्री ती आणि परमीत रात्री उशीरा कारमध्ये रोमान्स करत होते. त्यावेळी अचानक पोलिसानी त्यांच्या कारची काच ठोठावली आणि त्यांना रंगेहात पकडलं होतं.


अर्चना पुढे म्हणाली की, 'त्यावेळी मी खूप घाबरले होते. काय करावं हे मला समजत नव्हतं. पोलिसांना आम्ही आमचं लग्न झाल्याचंही सांगितलं'. 
तिने सांगितलं की, ' हे खरं तर खूप रिस्की होतं पण बाहेर पाऊस सुरू असताना कारमध्ये रोमान्स करणं मला आवडतं.' 


अर्चना आणि परमीत यांची लव्ह स्टोरी एका इव्हेंटमधून सुरू झाली. आयबी टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार पहिलं लग्न तुटल्यानंतर आर्चनाला कोणत्याही नात्यात अडकायचं नव्हतं. पण परमीतला भेटल्यानंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली आणि अखेर दोघंही लग्नाच्या बंधनात अडकले. प्रेमात पडल्यानंतर सुरुवातीला या दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

खरं तर त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. काही काळ एकत्र राहिल्यानंतर या दोघांनीही ३० जून १९९२ साली लग्न केले.

Web Title: archana puran singh revealed kapil sharma show says police caught me with parmeet in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.