निसर्गाच्या सानिध्यात वसलाय अर्चना पुरण सिंहचा बंगला, पाहा तिच्या आलिशाने घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:27 PM2021-05-06T18:27:09+5:302021-05-06T18:39:10+5:30

घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी अर्चनाने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

Archana Puran Singh and Parmeet Sethi's luxurious Madh Island home is nothing less than a resort | निसर्गाच्या सानिध्यात वसलाय अर्चना पुरण सिंहचा बंगला, पाहा तिच्या आलिशाने घराचे फोटो

निसर्गाच्या सानिध्यात वसलाय अर्चना पुरण सिंहचा बंगला, पाहा तिच्या आलिशाने घराचे फोटो

Next

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. अर्चना पुरसिंह राहत असलेल्या बंगल्याचीही चर्चा लॉकडाऊनमध्ये तुफान रंगली. मुंबईतल्या मड आयलँड भागात अर्चनाचा हा आलिशान बंगला आहे.

 अर्चना सोशल मीडियावर आपल्या बंगल्याचे फोटो शेअर करत असते. आपला बराच वेळ ती गार्डनमध्ये पक्ष्यांचा आवाज ऐकत घालवताना दिसते. नुकतंच तिने आपल्या बंगल्याची झलक चाहत्यांना दाखवली. सोशल मीडियावर खुद्द अर्चनाने एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहून या आलिशान बंगल्याच्या प्रेमात नाही पडला तरच नवल.

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी अर्चनाने बरीच मेहनत घेतली आहे. डायनिंगपासून गार्डन एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी अर्चनाने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

अनेकदा निवांत क्षण एन्जॉय करताना अर्चना दिसते. घरातले सदस्य देखील घराबाहेर असलेल्या गार्डनमध्ये व्यायाम करताना दिसतात. तिच्या या घराची खासियत म्हणजे. तिचे हे घरे गर्दीने गजबलेले मुंबईत असले तरी तिच्या परिसरात जास्त लोकांची वर्दळ नसते. आजुबाजुला समुद्र आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्याने अगदी शांततेच्या ठिकाणी ती राहते.

घराच्या अवतीभोवत भलेमोठ गार्डन आहे. अर्चना आपली आई आणि मुलांसह बराचसा वेळ इथेच एन्जॉय करते. तिच्या गार्डनमध्ये तिने विविध प्रकारच्या भाज्या देखील लावल्या आहेत. तिच्या या घराचे इंटिरिअर दिसायला सिंपल वाटत असले तरीही आकर्षक आहे.

 

घरात गडद रंगाचा वापर न करता पेस्टल फिक्या रंग तिने भींतीने दिला आहे. घराचे इंटेरिअर जितके ट्रेडिशनल आहे तितकेच मॉडर्न पद्धतीचेही वाटेल अशा प्रकारे करण्यात आले आहे. मुंबईमध्ये राहत असलेल्या घरांमधून जास्त तर उंच उंच इमारती दिसतात. मात्र अर्चना राहत असलेल्या घरातून निळाशार समुद्र दिसतो. आलिशान घरावरुन तिचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Archana Puran Singh and Parmeet Sethi's luxurious Madh Island home is nothing less than a resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app