Anupamaa: शाह हाउसमध्ये होणार नाही अनुपमा आणि अनुजचं लग्न, 'अनुपमा' मालिकेत नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:20 PM2022-05-13T18:20:28+5:302022-05-13T18:24:07+5:30

Anupamaa: 'अनुपमा' मालिकेत लवकरच अनुपमा आणि अनुजचं लग्न पाहायला मिळणार आहे.

Anupamaa: Anupama and Anuj's wedding will not take place in Shah House, new twist in 'Anupama' series | Anupamaa: शाह हाउसमध्ये होणार नाही अनुपमा आणि अनुजचं लग्न, 'अनुपमा' मालिकेत नवा ट्विस्ट

Anupamaa: शाह हाउसमध्ये होणार नाही अनुपमा आणि अनुजचं लग्न, 'अनुपमा' मालिकेत नवा ट्विस्ट

Next

'अनुपमा' या मालिकेत अनुज आणि अनुपमा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. अनुपमा या मालिकेच्या आगामी भागांमध्ये अनुज आणि अनुपमा यांचा हळदी समारंभ पार पडणार आहे. आत्तापर्यंत 'अनुपमा' या मालिकेत, अनुज आणि अनुपमाच्या संगीत सोहळ्यात बापूजींची तब्येत बिघडलेली पाहिली असेल. डॉक्टर बापूजींना ऑपरेशन करायला सांगतात. बापूजी उपचार घेण्यास नकार देतात. अनुपमा धमकी देऊनही बापूजी आपला निर्णय बदलत नाहीत. वनराज नाराज होतो. दरम्यान, अनुपमा या मालिकेच्या कथेत एक रंजक ट्विस्ट येणार आहे.

गौरव खन्ना, रुपाली गांगुली आणि सुधांशू पांडे स्टारर 'अनुपमा' या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळेल की, आजारपणातही बापूजी अनुपमाच्या लग्नाच्या तयारीची काळजी घेतील. लग्नाचे उर्वरित विधी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शाह कुटुंब लग्न स्थळी पोहोचणार आहे. लग्नस्थळी जाण्यापूर्वी अनुपमाची आई हळद दळणार आहे. अनुपमाच्या आईचा आनंद बा ला सहन होणार नाही. बा वनराजसमोर बसून अनुपमाला भयंकर शाप देताना दिसणार आहे. बा म्हणतेय की माझी इच्छा असूनही अनुपमाचे लग्न थांबवता येत नाही. याचा बाला पश्चाताप होईल. त्याचवेळी वनराजही डोके धरून बसेल.


अनुज स्वतःच्या हाताने अनुपमाला हळद लावणार आहे. यादरम्यान अनुज अनुपमाबद्दल काही भावनिक गोष्टी सांगणार आहे. अनुजचे प्रेम पाहून अनुपमा रडू लागली. त्याचवेळी शहा कुटुंबातील लोक वधू-वरांचे नजर काढतात. यादरम्यान शाह कुटुंबातील लोक अनुजची खिल्ली उडवतात. लग्न होईपर्यंत अनुज अनुपमाचा चेहरा पाहू शकणार नाही, असा दावा कुटुंबीय करतात.


अनुज आणि अनुपमाला एकत्र आनंदी पाहून वनराज चिडेल. वनराजकडून अनुपमाचा आनंद बघवला जाणार नाही. वनराजला अनुपमाचे लग्न थांबवण्यासाठी  संधी शोधेल. दुसरीकडे, काव्या अनुपमाच्या लग्नातील प्रत्येक विधी एन्जॉय करणार आहे.

Web Title: Anupamaa: Anupama and Anuj's wedding will not take place in Shah House, new twist in 'Anupama' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app