बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अनुप सोनीराज बब्बर यांचा जावई आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. अनुप सोनीने क्राईमवर आधारीत शोचं बराच काळ सूत्रसंचालन केलं आहे. तसेच दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या गंगाजल आणि अपहरण चित्रपटातही तो झळकला आहे.


काळाच्या बदलानुसार त्याने आता चित्रपटाकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवाय डिजिटल माध्यमातही त्याला इंटरेस्ट आहे. मात्र त्याला चित्रपटात काम मागण्याची वेळ आली आहे.


आजतकच्या रिपोर्टनुसार, अनुप सोनीने सांगितलं की, हे नशीब आहे किंवा चित्रपट निर्माते माझा विचार करत नाही. मी म्हणत नाही की ही त्यांची चुकी आहे. त्यांच्याकडे माझ्यासाठी रोल नक्कीच असेल, पण मी बराच काळ क्राईमवर आधारीत शोमध्ये व्यग्र होतो. त्यादरम्यान चित्रपट निर्माते माझ्याकडे ऑफर्स घेऊन आले होते मात्र माझ्याकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नकार दिला. त्यामुळे त्यांनी माझे बिझी शेड्युल पाहून मला ऑफर करून फायदा नाही असा विचार केला असेल.


मात्र गेल्या पंधऱ्या महिन्यांपासून अनुप सोनीच्या करियरमध्ये चांगलं वळण आलं आहे. यादरम्यान त्याने जवळपास ६ ते ७ प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. यात संजय दत्तसोबत प्रस्थानम व वेब सीरिज बॉम्बर्सचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त एक वेब शोचं शूटिंग करत आहे. त्याने सांगतलं, यातील सर्व पात्र खूप वेगळं आहे. 


त्याने पुढे सांगितलं की, आता मी स्वतः निर्मात्यांकडे जाऊन काम मागत आहे. आज इथे खूप लोक आहेत. अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहे. जर तुम्हाला चांगलं काम करायचं आहे तर तुम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहचता. मी निर्माते-दिग्दर्शकांकडे काम मागण्यासाठी अजिबात घाबरत नाही. खासकरून ज्या लोकांना ज्यांच्यासोबत मला काम करायचं आहे.

आता काळ बदलला आहे. कलाकारांना त्यांच्यानुसार काम मिळू लागलंय आणि ही आनंदाची गोष्ट आहे.


Web Title: anup soni now want work to do
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.