Anjali angry on rana, she punished him in Tuzyat Jeev Rangala | बापरे...! 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये अंजलीच्या सहनशक्तीचा अंत, राणादाला मिळणार का शिक्षा?
बापरे...! 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये अंजलीच्या सहनशक्तीचा अंत, राणादाला मिळणार का शिक्षा?

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आलाय. या मालिकेचा प्रोमो या मालिकेत अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्या प्रोमोमध्ये अंजलीने राणादाला सहनशक्तीचा अंत झाला असल्याचं सांगत यापुढे तुम्हाला मुल हवे असेल तरी मला नको असं म्हटलंय.


अक्षयाने तुझ्यात जीव रंगला मालिकेचा प्रोमो शेअर करून लिहिलंय की, अंजलीच्या सहनशक्तीचा अंत, राणाला भोगावे लागणार त्याच्या भोळचटपणाचे परिणाम! राणा-अंजलीचं नातं निर्णायक वळणावर! 


या प्रोमोत अंजली आज वटपोर्णिमा आहे, मला मागेल ते द्याल मला का असे राणादाला बोलते. माझं मातृत्व हिरावून हा अधिकार दुसऱ्या कुणाला कसा दिला. हा भोळेपणा नाही हा बावळटपणा आहे. यापुढे जरी तुम्हाला मुलं हवं असेल ना तरी मला नकोय. असे अंजली बोलताना दिसतेय. अंजली राणादाला असे का म्हणाली व वहिनीसाहेबांनी कोणता नवीन डाव रचलाय. हे पाहण्यासाठी ही मालिका पहावी लागेलय 


तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली असून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी चॅनेलवर प्रदर्शित होते. या मालिकेत हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (पाठक बाई ), छाया सानगावकर (गोदाक्का), धनश्री काडगावकर (नंदिता), राज हानचांगले (सनी दा), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनावणे (चंदा) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
 

Web Title: Anjali angry on rana, she punished him in Tuzyat Jeev Rangala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.