anita hassanandani and rohit reddy introduce their son aaravv with this explosive video | OMG! फटाका फुटला अन् बाळ अवतरलं...; अनिता हसनंदानीचा ‘धमाका’, दाखवला बाळाचा चेहरा

OMG! फटाका फुटला अन् बाळ अवतरलं...; अनिता हसनंदानीचा ‘धमाका’, दाखवला बाळाचा चेहरा

ठळक मुद्देअनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी नुकतेच आई-बाबा झाले. गेल्या 9 फेब्रुवारीला अनिताने गोंडस मुलाला जन्म दिला होता. मुलाच्या जन्माची गोड बातमी रोहितने इन्स्टावर शेअर केली होती. यानंतर या बाळाचे काही फोटोही या जोडप्याने शेअर केले होते. पण त्याला बाळाचा चेहरा दिसला नव्हता. पण आता अनिता व रोहित यांनी एक धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आपल्या मुलाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबत मुलाच्या नावाचीही घोषणा केली आहे. अनिता व रोहितने मुलाचे नामकरण आरव असे केले आहे.

धमाका अन् मुलाचा चेहरा...
अनिता व रोहितने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच मजेदार आहे. यात  अनिताच्या बेबी बम्पवर  एक फटाका काळ्या रंगात रंगवलेला आहे. रोहित त्याची वात पेटवण्याची अ‍ॅक्शन करतो. पुढच्याच सेकंदाला फटाका जोरात फुटून अनिता आणि रोहितच्या हातात बाळ अवतरतं. तिघांचेही चेहरे फटाक्याच्या राखेने काळे झालेले दिसतात. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. कभी सौतन, कभी सहेली, ये हैं मोहब्बते,  नागीन 3  या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या सात वषार्नंतर या कपलला अपत्यप्राप्ती झाली आहे
  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anita hassanandani and rohit reddy introduce their son aaravv with this explosive video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.