Anagha Devi's entry in 'sri gurudev dutt' series! | ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत अनघा देवींची होणार एंट्री!
‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत अनघा देवींची होणार एंट्री!

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत नवा अध्याय सुरु होतोय. कर्णकुमार आणि जांभासूर यांचा श्री दत्तांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न अखंड सुरु असताना आता या कथानकात अनघा देवींची एण्ट्री होणार आहे. अनघा देवींच्या येण्याने भक्तांमध्ये दत्तांविषयी अनेक संभ्रम निर्माण होणार आहेत. वाडी, गाणगापूर आणि औंदुबर या दत्तक्षेत्रांवर जांभासुर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

इतकंच नाही तर श्री गुरुदेव दत्तांच्या नावातल्या श्री आणि गुरुदेव या दोन्ही शब्दांवरही त्याचा आक्षेप आहे. श्रीदत्तांच्या नावाचा धावा करणाऱ्या भक्तांना दंड होईल असा फतवाही जांभासुराने काढलाय. जांभासुराच्या अत्याचारांनी भक्तगण त्रस्त असताना श्रीदत्त मात्र अनघादेवींच्या मोहपाशात अडकले आहेत. माता अनसुयेचाही त्यांना विसर पडला आहे. भक्तांच्या उद्धारासाठी सदैव तत्पर असलेले श्री दत्त अनघा देवींच्या येण्याने भक्तांपासूनच दूर होत आहेत.

श्री दत्तांच्या अश्या वागण्यामागचं नेमकं कारण काय? अनघा देवींच्या प्रकट होण्यामागे काय रहस्य आहे? याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे. 

Web Title: Anagha Devi's entry in 'sri gurudev dutt' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.