ठळक मुद्देकौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सेटवर ही मांजर चुकून आली होती. पण या मांजरीमुळे सेटवरील सगळ्यांचे खूप चांगलेच मनोरंजन झाले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सगळेच सिझन चांगलेच गाजले आहेत. या कार्यक्रमाचा अकरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील तसेच भारतातील विविध भागात राहाणारे लोक हजेरी लावत असतात. 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील स्पर्धक सात करोड रुपये जिंकण्याच्या आशेने या कार्यक्रमात हजेरी लावतात. त्यामुळे या कार्यक्रमात येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांसाठी हा खेळ खूपच महत्त्वाचा असतो. पण हा खेळ सोडून अनेकवेळा स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी कार्यक्रमात गप्पा मारताना देखील दिसतात. 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सेटवर नुकताच एक अनपेक्षित पाहुणा आला होता. पण या पाहुण्यामुळे सेटवर सगळ्यांची तारांबळ उडाली होती. हा पाहुणा दुसरा कोणीही नसून एक मांजर होती. या पाहुण्याविषयी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीच सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे. 

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतात. त्यांनी ट्विटवरला कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सेटवरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत आपल्याला एक मांजर दिसत असून ती मांजर सेटवर मस्तपैकी फिरत आहे. एवढेच नव्हे तर ती सेटवर लोळताना देखील दिसत आहे. या फोटोंसोबतच अमिताभ यांनी एक कविता देखील पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 
ऐ बिलौरी , बिल्ली बिल्ली , खेलन चली KBC 
जैसे आई Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सेटवर ही मांजर चुकून आली होती. पण या मांजरीमुळे सेटवरील सगळ्यांचे खूप चांगलेच मनोरंजन झाले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अमिताभ यांच्या पोस्टवर अनेक कमेंट आल्या असून ही मांजर कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम खेळण्यासाठीच सेटवर आली होती असे नेटकरी बोलताना दिसत आहेत. 

Web Title: Amitabh Bachchan’s tweet after cat gatecrashes KBC has netizens in splitsh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.