ठळक मुद्देएकता कपूर कमालीची धार्मिक आहे. न्युमरॉलॉजीवर तिचा प्रगाढ विश्वास आहे. 

एकता कपूर प्रत्येक बाबतीत ज्योतिषाची मदत घेते. मग ती शूटींगची जागा असू दे, तारीख असू दे किंवा मालिका वा चित्रपटाचे नाव. हातांच्या दहाही बोटात अंगठ्या, धागे-दोरे, ब्रेसलेट्स म्हणजे एकता कपूर. याशिवाय तिला पाहण्याची कल्पनाही कदाचित कुणी करणार नाही. पण हे काय? लॉकडाऊनच्या काळात असे काही झाले की, सगळेच हैराण झाले. होय, एकताच्या बोटांतल्या अंगठ्या गायब दिसल्या. 
एकताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती आपल्या हाताची बोटे दाखवताना दिसतेय.

 ऐरवी एकताच्या डाव्या व उजव्या दोन्ही हातांच्या बोटात विविध प्रकारच्या अंगठ्या दिसतात. हातात वेगवेगळ्या प्रकारचे गंडेदोरे दिसतात. पण या व्हिडीओत तिच्या बोटात एकही अंगठी नाही. विशेष म्हणजे, हात अशाप्रकारे फ्री झाल्याने एकता कमालीची आनंदी दिसतेय.

 हा व्हिडीओ शेअर करताना एकताने दिलेले कॅप्शनही खास आहे. ‘थानोसने बिल्डींग सोडलीय. त्याने जगाला नष्ट केले. गंमत करतेय,’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिलेय. हे कॅप्शन वाचून एकताच्या मनात नेमके काय आहे, याचा बोध होत नाही. पण हो, तिने आपल्या बोटातल्या अंगठ्या काढल्यामुळे सगळेच सरप्राईज आहेत, इतके मात्र नक्की.
एकता कपूर कमालीची धार्मिक आहे. न्युमरॉलॉजीवर तिचा प्रगाढ विश्वास आहे. याचमुळे ती आपल्या हातात वेगवेगळ्या अंगठ्या, ब्रेसलेट घालताना दिसते.

काही दिवसांपूर्वी एकताने हात धुण्याचे चॅलेंज स्वीकारले होते.  हे चॅलेंज पूर्ण करतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला होता. मात्र यावरून एकता ट्रोल झाली होती. एकताने हातातल्या अंगठ्या, धागेदोरे काढून टाकायला हवेत, असा सल्ला अनेकांनी यावेळी तिला दिला होता. हात धुण्यापेक्षा अधिक वेळ या अंगठ्या स्वच्छ करण्यात जाईल, अशा शब्दांत लोकांनी तिला ट्रोल केले होते. या ट्रोल करणा-यांना एकतानेही उत्तर दिले होते. मी डॉक्टरांना विचारले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगठ्या काढण्याची गरज नाही. यामुळे काहीही धोका नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे तिने म्हटले होते.

Web Title: amid corona lockdown ekta kapoor surprised fans removed all her rings from hand shared video-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.