Aladdin’s Ghost To Reveal Zafar’s Conspiracy In Front Of The Entire Kingdom | 'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये संपूर्ण साम्राज्‍यासमोर या गोष्टींचा होणार उलगडा
'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये संपूर्ण साम्राज्‍यासमोर या गोष्टींचा होणार उलगडा

अलाद्दिनचे भूत त्‍याचा सर्वात मोठा शत्रू जफरचा सूड घेण्‍यासाठी परतले आहे. ज्‍यामुळे चाहत्‍यांना रंजक साहसी कृत्‍ये पाहायला मिळणार आहे. 'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिनचे भूत जवळपास जफरला ठार मारणारच होते, पण आता ते भूत जफरच्‍या गुन्‍ह्यांना समोर आणणार आहे. 


सुंदर जिनी मिनी जिनूला (राशुल टंडन) तिच्‍यासोबत वेळ व्‍यतित करण्‍यासाठी विचारते आणि जिनू ते मान्‍य करतो. अलीचे (सिद्धार्थ निगम) सर्वोत्‍कृष्‍ट जिनीज या संधीचा फायदा घेत जफरला (आमिर दळवी) घाबरवतात. ते जफरसमोर रक्‍ताने माखलेले हात आणि राजाचे भूत अशी भयानक दृश्‍ये दाखवत त्‍याला घाबरवण्‍याचा प्रयत्‍न करतात. जफर खूपच घाबरून जातो. तो अली व यास्‍मीनच्‍या (अवनीत कौर) बतावणीवर विश्‍वास ठेवतो. बतावणी अशी असते की, जफर राजाचा खरा खूनी असल्‍याचे सिद्ध करण्‍यासाठी अलाद्दिनचे भूत त्‍याच्‍याभोवती फिरत आहे. 


जफरला अलाद्दिनच्‍या भूताकडून एक संशयास्‍पद पत्र मिळते, तेव्‍हा परिस्थिती गंभीर वळण घेते. त्‍या पत्रामध्‍ये जफरचा हेतू बाजारपेठेच्‍या मध्‍यभागी संपूर्ण बगदादसमोर उलगडा करण्‍याचे लिहिण्‍यात आलेले असते. दुसरीकडे यास्‍मीनचा अलाद्दिनचे भूत खरंच अस्तित्‍त्‍वात असण्‍यावर विश्‍वास बसत नाही आणि ती अलीवर बारकाईने नजर ठेवण्‍याचे ठरवते. जफर बाजारपेठेकडे रवाना होतो. यास्‍मीन अलीला तिच्‍यासोबत येण्‍यास सांगते, ज्‍यामुळे तिला अलाद्दिनचे भूत खरंच आहे की नाही याबाबत उलगडा होऊ शकेल. 


अलाद्दिन ऊर्फ अलीची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्‍हणाला, ''अलीचा जफरच्‍या कटकारस्‍थानांचा उलगडा करण्‍याचा मास्‍टर प्‍लान अखेरीस अंतिम टप्‍प्‍यावर पोहोचत आहे. अलाद्दिन दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्‍या न्‍यायाच्‍या जवळ पोहोचला आहे. या आठवड्यातील आगामी एपिसोड्स अनेक सरप्राईजेजने भरलेले आहेत. आगामी एपिसोड्ससाठी शूटिंग करण्‍याचा मी भरपूर आनंद घेतला आहे. मला अलाद्दिनच्‍या भूमिकेची धावपळ जाणवत आहे. आगामी एपिसोड्स जफरच्‍या कटकारस्‍थानांचा उलगडा करतील. 


जफरची भूमिका साकारणारा आमिर दळवी म्‍हणाला, ''जफर अलाद्दिनचे भूत पाहून खूपच घाबरून गेला आहे. पण त्‍याने राजाच्‍या खूनामागील सत्‍याचा उलगडा न करण्‍याचा निर्धार केला आहे. जफर त्‍याचा सर्वात शक्तिशाली जिन 'जिनू'सह पुन्‍हा एकदा अलाद्दिनला पराभूत करेल. एक कलाकार म्‍हणून या एपिसोड्ससाठी शूटिंग करणे खूपच आव्‍हानात्‍मक होते. 

Web Title: Aladdin’s Ghost To Reveal Zafar’s Conspiracy In Front Of The Entire Kingdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.