ठळक मुद्देबॉबी देओल म्हणाला की, माझे एका मुलीवर प्रेम होते. पण ही गोष्ट मी तिला कधीच सांगू शकलो नाही. मी तेव्हा खूप लाजाळू होतो आणि आजही तितकाच लाजाळू आहे.

दिवाळीच्या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या शनिवारच्या आणि रविवारच्या भागात खास हाऊसफुल 4 ची टीम हजेरी लावणार आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, किर्ती खरबंदा, कृती सॅनन, पूजा हेगडे, चंकी पांडे हे सगळेच या कार्यक्रमात हजेरी लावत मजा मस्ती करणार आहेत. यांच्यासह निर्माते साजिद नाडियावाला देखील उपस्थित राहाणार आहेत. 

अक्षय कुमार, रितेश आणि बॉबी यांनी या कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्सविषयी सांगितले. तुम्ही कधी कोणाला प्रपोज केले असून त्यांनी तुम्हाला नकार दिला आहे का असे कपिलने अक्षय, रितेश, आणि बॉबीला विचारले. त्यावर रितेश म्हणाला की, मी ज्या मुलीला प्रपोज केले होते, त्या मुलीने होकार दिला की नकार हेच मला अद्याप माहीत नाही. कारण तिने मला याविषयी कधीच सांगितले नाही. हे ऐकून उपस्थित सगळेच हसू लागले. त्यावर अक्षय कुमार पुढे म्हणाला की, तो पूर्वी प्रचंड लाजाळू होता. तो एका मुलीबरोबर दोन वेळा कॅफे आणि चित्रपटांसाठी बाहेर गेला होता. पण त्या मुलींच्या नात्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या याची जाणीव त्याला त्या वयात झाली नव्हती. बहुधा मी अधिक रोमँटिक असावा असे तिला वाटत होते. मी तिचा हात पकडावा, तिला जवळ घ्यावे अशी तिची अपेक्षा होती. पण मी खूप लाजाळू असल्याने यातील काहीच करत नव्हतो. बहुधा त्यामुळेच ती मला सोडून गेली. 

हे संभाषण सुरू असताना बॉबी देओल म्हणाला की, माझे एका मुलीवर प्रेम होते. पण ही गोष्ट मी तिला कधीच सांगू शकलो नाही. मी तेव्हा खूप लाजाळू होतो आणि आजही तितकाच लाजाळू आहे. मी कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर वेड्यासारखे प्रेम करत होतो. पण मला तिला सांगण्याची कधी हिंमतच झाली नाही. मी एकदा लायब्रेरीमध्ये बसलेलो असताना माझ्या वडिलांसाठी तू रक्तदान करशील का असे ती मला विचारायला आली होती. मला वाटले की संभाषण सुरू करण्याची ही चांगली संधी आहे. पण जेव्हा मी रक्तदान करायला गेलो तेव्हा मी सुईकडे पाहून इतका घाबरून गेलो की माझा बीपी वाढला. ज्यामुळे मला रक्तदानच करता आले नाही आणि मी तिच्याशी संवाद साधण्याची संधी गमावली. 

Web Title: Akshay Kumar, Ritesh Deshmukh and Bobby Deol share their love story on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.