'अजूनही बरसात आहे' मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतचा नवीन लूक चर्चेत,फोटोही होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:13 PM2021-07-21T12:13:43+5:302021-07-21T12:17:31+5:30

'अजूनही बरसात आहे' या मालिकेत प्रेक्षकांना काही फ्लॅशबॅक सीन बघायला मिळता आहेत ज्यातून मीरा आणि आदिराज यांची भूतकाळातली प्रेमकहाणी उलगडतेय.

Ajunhi Barsaat Ahe cast Mukta Barve & Umesh Kamat's new look in serial going viral,Check Here | 'अजूनही बरसात आहे' मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतचा नवीन लूक चर्चेत,फोटोही होतायेत व्हायरल

'अजूनही बरसात आहे' मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतचा नवीन लूक चर्चेत,फोटोही होतायेत व्हायरल

Next

बऱ्याच वर्षांनी उमेश कामत आणि मुक्ता बर्वे हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मालिका आणि मालिकेतले मीरा (मुक्ता) आणि आदिराज (उमेश) यांची प्रेमकथा प्रेक्षकांना आवडते आहे. प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत मीरा आणि आदिराज प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करताहेत.

 

इतकंच नाही तर मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली  छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर  #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे. 

मालिका दिवसेंदिवस रंजक होत जातेय आणि प्रेक्षकांचा मालिकेतला आणि गोष्टीत आता पुढे काय होणार, यातला रस अजून वाढत जातोय. मालिकेची गोष्ट ही आदिराज आणि मीरा यांच्या प्रेमकथेभोवती फिरते आहे. त्यामध्ये प्रेक्षकांना काही फ्लॅशबॅक सीन बघायला मिळताहेत ज्यातून मीरा आणि आदिराज यांची भूतकाळातली प्रेमकहाणी उलगडतेय. या फ्लॅशबॅक सिन्सना प्रेक्षकांची खास पसंती मिळतेय आणि हे सीन चित्रित करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण टीम अतिशय मेहेनत घेते आहे. या सिन्ससाठी कलाकार आत्ताच्या वयापेक्षा १० वर्षं तरुण दाखवण्यात आले आहेत. त्यासाठी मुक्ताची वेगळी हेअर स्टाईल आणि उमेशचा बिना दाढीचा लूक दाखवण्यात आला आहे. 

फ्लॅशबॅकसाठी पूर्ण दाढी केल्यानंतर पुन्हा वर्तमानातलं चित्रीकरण करण्यासाठी उमेशला मध्ये २-३ दिवस वेळ द्यावा लागतोय. सध्या चित्रीकरणासाठी अनेक प्रकारचे नियम पाळावे लागताहेत अशा परिस्थितीत दोन लुक्स सांभाळून चित्रीकरण करणं, ही कलाकारांसाठी आणि टीमसाठी तारेवरची कसरत आहे आणि मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम हे या केलेल्या कसरतीचं फळ आहे, हे नक्की. 
.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ajunhi Barsaat Ahe cast Mukta Barve & Umesh Kamat's new look in serial going viral,Check Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app