Ajay Atul signs Jannabi Das for their next song on Indian Idol season 11 sets | अजय अतुलने केलेली ही गोष्ट वाचून तुम्हाला देखील वाटेल त्यांचा अभिमान
अजय अतुलने केलेली ही गोष्ट वाचून तुम्हाला देखील वाटेल त्यांचा अभिमान

ठळक मुद्देजन्नबीच्या परफॉर्मन्सने अजय अतुल प्रभावित झाले असून त्यांनी त्यांच्या पुढील गाण्यासाठी तिला करारबद्ध केले. यामुळे जन्नबी खूपच भावनिक झाली आणि हे प्रत्यक्षात घडत आहे यावर तिचा विश्वासच बसला नाही.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या  इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.  अनु मलिक, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. यावर्षीच्या इंडियन आयडॉलची थीम ‘एक देश एक आवाज’ असून या आठवड्यात इंडियन आयडल या कार्यक्रमात शेवटच्या दहा स्पर्धकांची निवड झाली आहे. या आठवड्यात या मुलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी अजय अतुल हजेरी लावणार आहेत.


 
इंडियन आयडॉल सिझनची जॅझी गायक दिल्लीच्या जन्नबी दासने हावरा ब्रीज चित्रपटातील मेरे नाम चीन चीन चू हे गाणे सादर करत सर्वांनाच वेड लावले. तिच्या परफॉर्मन्सने अजय अतुल प्रभावित झाले असून त्यांनी त्यांच्या पुढील गाण्यासाठी तिला करारबद्ध केले. यामुळे जन्नबी खूपच भावनिक झाली आणि हे प्रत्यक्षात घडत आहे यावर तिचा विश्वासच बसला नाही. अजयने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हटले की, तिला भेट देण्यासाठी एक पियानो आणायला पाहिजे होता. आम्ही सुरुवातीला गाणे बनवतो आणि मग गायक ठरवतो मात्र हिच्या आवाजामुळे त्याला सुसंगत गाणे बनवण्यास आम्ही प्रेरित झालो आहोत.


 
जन्नबीच्या जबरदस्त परफॉर्मन्सचे कौतुक करताना विशाल म्हणाला, “तू जेव्हाही परफॉर्म करते तेव्हा सर्वांना वेड लावते. मी हे नक्की सांगू शकतो की, तू इतर कलाकारांप्रमाणे गाऊ शकत नाही मात्र इतर कलाकारही तुझ्याप्रमाणे गाऊ शकत नाही. तू ज्याप्रकारे परफॉर्म करते त्याने विलक्षण वातावरण निर्माण होते.


 

Web Title: Ajay Atul signs Jannabi Das for their next song on Indian Idol season 11 sets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.