होम मिनिस्टर Work From Home; झी मराठीच्या अन्य मालिकांबाबत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 11:13 AM2021-04-22T11:13:46+5:302021-04-22T11:17:38+5:30

सगळ्यात आधी स्टार प्रवाह मालिकांचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर होणार आहेत. त्यासाठी कलाकारांची कोरोना चाचणीही झाली आहे. स्टार प्रवाह पाठोपाठ आता झी मराठीने देखील असाच निर्णय घेतला आहे.

After Star Pravah Zee Marathi Serials Also Shoot relocated outside Maharashtra over Lockdown | होम मिनिस्टर Work From Home; झी मराठीच्या अन्य मालिकांबाबत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

होम मिनिस्टर Work From Home; झी मराठीच्या अन्य मालिकांबाबत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

गेल्याच वर्षी कोरोना व्हायरसमुळे काही महिने नाटक मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग थांबले होते. मात्र मनोरंजनसृष्टीला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मोठे नुकसान झाले होते. कोरोना जसजसा आटोक्यात येत होता असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा काही नियम आणि अटींसोबत शूटिंगला परवानगी देण्यात आली होती.  मात्र पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भाव वाढु लागला आणि पुन्हा गेल्या वर्षी प्रमाणे तशीच परिस्थिती यावर्षीही उदभवली आहे. कोरोनाचा शिरकाव मालिकांच्या सेटवरही झाला.

 

अनेक कलाकारांना शूटिंग दरम्यान कोरोनाची लागण झाली. मात्र रसिकांचे मनोरंजासाठी मध्येच कुठेही मालिका बंद करण्याची वेळ येऊ नये कोरोनाचे सावट असूनही मालिकांचे शूटिंगही सुरुच आहेत. परिस्थिती आता हाता बाहेर जाऊ नये म्हणून मालिकांचे चित्रिकरण आता महाराष्ट्राबाहेर होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सगळ्यात आधी स्टार प्रवाह मालिकांचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर होणार आहेत. त्यासाठी कलाकारांची कोरोना चाचणीही झाली आहे. स्टार प्रवाह पाठोपाठ आता झी मराठीने देखील असाच निर्णय घेतला आहे. पाहिले ना मी तुला (गोवा),अग्गंबाई सुनबाई (गोवा),येऊ कशी तशी मी नांदायला (दमण) माझा होशील ना – सिल्व्हासा, देवमाणूस (बेळगाव) चला हवा येऊ द्या  (जयपूर),रात्रीस खेळ चाले 3 मालिकेच आधीच काही शूटिंग करुन झालेले आहे. त्यामुळे आगामी काळात एपिसोड टेलिकास्ट करण्यासाठी त्यांनी काही भागाचे शूटिंग झालेले असल्यामुळे अद्यापतरी चित्रिकरण लोकेशनविषयी निर्णय घेण्यात आलेला नाहीय. यात झी मराठी चॅनेलवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम होम मिनिस्टर पुन्हा वर्क फ्रॉम होमच सुरु करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात होणार नाही या मालिकांचे चित्रिकरण, जाणून घ्या कोण कोणत्या मालिकांचा आहे यात समावेश

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, स्वाभिमान यासारख्या बहुतांश मालिका सध्या रंजक वळणावर आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह चॅनलकडून घेण्यात आली आहे.यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं चित्रीकरण गोव्यात होणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची टीमही चित्रीकरणासाठी गोव्यात स्थंलांतरीत होईल.

Web Title: After Star Pravah Zee Marathi Serials Also Shoot relocated outside Maharashtra over Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.