अनुष्का शर्मा, अमृता राव आणि करिना कपूरनंतर टीव्ही अभिनेत्री अनिता हंसनंदानीदेखील चाहत्यांसह तिची गुड न्यूज शेअर केली होती. अनिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून गुड न्यूज शेअर केल्यापासून तिची प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. विविध अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

प्रेग्नंसीच्या अखेरच्या टप्पात अनिता असून कधीही आई बनू शकते. सध्या हे कपल दोघेही आपल्या बाळाच्या आगमनाची वाट पाहात आहे. पुन्हा एकदा तिने नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फेब्रुवारीमध्ये अनिता बाळाला जन्म देणार आहे. हे तिचे पहिलेच बाळ आहे.

टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डीसर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.रोहितही अनिताची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. खास करुन प्रेग्नंसीदरम्यान रोहित तिची जास्त काळजी घेत आहे.


अनिताने नेहमी आनंदितच राहावे असा त्याचा अट्टहास असतो. त्यामुळे सध्या हे कपल त्यांचे खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत. अनिताला जराही कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही याची खबरदारी सध्या रोहित घेताना दिसतोय.घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार म्हटल्यावर दोघे चांगलेश खुश आहेत.

 

अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते.लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Kareena Kapoor Khan, TV star Anita Hassanandani shows off baby bump in maternity shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.