'मी मेल्यानंतर...'; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:13 PM2021-12-03T18:13:46+5:302021-12-03T18:14:14+5:30

कुशल बद्रिकेची सोशल मीडियावरील पोस्ट होतेय व्हायरल

'After I die ...'; Kushal Badrike's post caught everyone's attention | 'मी मेल्यानंतर...'; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

'मी मेल्यानंतर...'; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

Next

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो चला हवा येऊ द्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. भाऊ कदम यांनी या शोला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्याचप्रमाणे कुशल बद्रिकेने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तो यासाठी आपल्या चाहत्यांचे नेहमीच आभार मानताना दिसतो. आता देखील कुशल बद्रिके याने एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके पांडू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोघांसोबत या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामुळे कुशल बद्रिके खूप चर्चेत आला आहे. दरम्यान त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तो खूप चर्चेत आला आहे. 


कुशलने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी मेल्यानंतर मिडियाकडे एक तरी गाणे असावे वाजवायला ज्यात मी आहे. असे मला कायम वाटायचे, असे एक जबरी गाणे दिल्याबद्दल अवधूत गुप्ते सर सगळ्यात आधी तुम्हाला लै लै थँक्य यू. 
त्यातही ‘बुरुम बुरुम’ गाण्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर केळेवाली गाण्याला २४ तासांत १० लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: 'After I die ...'; Kushal Badrike's post caught everyone's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app