Exclusive: 'बिग बॉस'नंतर उषा नाडकर्णी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 02:37 PM2019-01-12T14:37:57+5:302019-01-12T14:40:12+5:30

महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी 'बिग बॉस' या रिएलिटी शोनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

After Bigg Boss, Usha Nadkarni appears again on small screens | Exclusive: 'बिग बॉस'नंतर उषा नाडकर्णी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

Exclusive: 'बिग बॉस'नंतर उषा नाडकर्णी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

Next
ठळक मुद्दे'बिग बॉस'नंतर उषा नाडकर्णी पुन्हा दिसणार कलर्स मराठी वाहिनीवर उषा नाडकर्णी दिसणार घाडगे & सून मालिकेत

महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी 'बिग बॉस' या रिएलिटी शोनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'घाडगे & सून' मालिकेत दिसणार आहेत. त्या कोणत्या भूमिकेत दिसणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. 

'घाडगे & सून' मालिकेत मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे आणि त्याचवेळेस माईंची चुलत सासू घाडगे सदनामध्ये येणार आहे. या चुलत सासूच्या भूमिकेत उषा नाडकर्णी दिसणार आहेत. उषा नाडकर्णी बिग बॉसच्या घरानंतर आता घाडगे सदनमध्ये दाखल होणार आहेत. माईंच्या चुलत सासूला अक्षयचे कियारासोबत दुसरे लग्न झाले हे माहित नाही. त्यामुळे आता अक्षय आणि अमृता पुन्हा एकत्र येणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. घाडगे सदनात अमृता सौभाग्यवतीसारखी मंगळसूत्र व साडीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मकरसंक्रात अमृता साजरी करणार की कियारा हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
उषा नाडकर्णी यांच्या भूमिकेमुळे घाडगे & सून मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'घाडगे & सून' या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर अक्षयची तर भाग्यश्री लिमये अमृताची भूमिका साकारत आहेत तर माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी आहेत.  

Web Title: After Bigg Boss, Usha Nadkarni appears again on small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app