छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या सीझनमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले होते. तिने अंकित मगरेसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता तिने पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर त्याच्यासोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत अंकित असून तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते आहे. त्यामुळे तिने लग्न केले का, या चर्चेला उधाण आले आहे.

रुपाली भोसलेने इंस्टाग्रामवर अंकित मगरे सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आय लव्ह यू अंकित मगरे. मैं तेरी प्रिन्सेस हूँ. या फोटोत रुपालीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसते आहे. त्यामुळे त्या दोघांनी लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे रुपालीने अधिकृत काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे तिचे चाहते याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

रुपालीच्या जोडीदाराचे नाव अंकित मगरे असून तो एक बिझनेसमॅन आहे. त्यानेदेखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रुपालीसोबतचे फोटो पहायला मिळतात. त्यांच्या या फोटोंना खूप पसंती मिळत असते.

रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेत ती संजनाची भूमिका साकारते आहे. या मालिकेतील तिच्या कामाचे खूप कौतूक होत आहे.

नुकतेच बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत रविवारी तेजस देसाईसोबत लग्नबेडीत अडकली आहे. लॉकडाऊनच्या काळात शर्मिष्ठाने नव्या आयुष्याची सुरुवात केली. तिच्या लग्नसोहळ्याला काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तेवढे उपस्थित होते.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Bigg Boss fame Sharmishtha Raut, did Rupali Bhosale also get married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.