Aditya narayan and shweta agarwal honeymoon photo from srinagar viral on social media | काश्मीरमध्ये हनीमून एन्जॉय करत असलेल्या आदित्य नारायणाने शेअर सुंदर फोटो, म्हणाला-सुकून, श्वेता और शिकारा

काश्मीरमध्ये हनीमून एन्जॉय करत असलेल्या आदित्य नारायणाने शेअर सुंदर फोटो, म्हणाला-सुकून, श्वेता और शिकारा

गायक आणि होस्ट आदित्य नारायण पत्नी श्वेता अग्रवालसोबत श्रीनगरमध्ये हनिमून एन्जॉय करतोय. त्याने पत्नी श्वेतासोबतचा स्वत: चा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, जो खूपच पसंत केला जात आहे. फोटोत कपलमधले जबरदस्त बॉन्डिंग दिसते आहे.

आदित्य नारायणने  इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “सूर्यात, सुकून, श्वेता आणि शिकारा सुंदर दृश्य नाही का?” फोटोमध्ये आदित्य आणि श्वेता डल लेकमध्ये बोट राईड एन्जॉय करताना दिसतायेत. कपलचे क्यूट बॉन्डिंगवर फॅन्स कमेंट करतायेत. यापूर्वी एका मुलाखतीत आदित्य नारायणने आपल्या हनीमून प्लानबद्दल सांगितले होते की, कामाच्या दबावामुळे तो तीन छोट्या हनीमूनचे प्लान केले आहे. 

शूटिंगच्या कामासाठी दर आठवड्याला मुंबईला येणे मला आवश्यक आहे असे तो म्हणाला होते. अशा परिस्थितीत आम्ही तीन छोट्या हनीमूनचे प्लनिंग केले आहे.यात आदित्यने शिलिम, सुला वाइनयार्ड्स आणि गुलमर्गला जाणार असल्याचे म्हटले होते. काश्मीरला तर आदिचत्य पोहोचला आहे. आता आणखी दोन म्हणजे शिलिम आणि सुला वाइनयार्ड हे दोन्ही महाराष्ट्रात असणाऱ्या ठिकाणी देखील तो हनीमूनसाठी जाणार आहे. आदित्य आणि श्वेताचा या महिन्यात विवाह बंधनात अडकले.  आदित्य आणि श्वेताची भेट १० वर्षांपूर्वी 'शापित' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aditya narayan and shweta agarwal honeymoon photo from srinagar viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.