सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे कलाकार आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची अपडेट सगळ्यात आधी सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र अशीही एक अभिनेत्री आहे जिला आपले आयुष्य हे फक्त आणि फक्त आपल्यापुरतेच मर्यादित रहावे असे वाटते. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचे नाव आहे आदिती देव शर्मा. तिने 'लाखों में एक','तेरी मेरी लव्हस्टोरी', मालिकेत काम केले असून सध्या  'सिलसिला बदलते रिश्तो का' मालिकेत ती  झळकत आहे. 


आदितीने  ती प्रेग्नंट असल्याची बातमी तिच्या चाहत्यांपासून लपवून ठेवली. 9 महिने तिने ही गुड न्यूज कोणालाही कळू दिली नव्हती. अखेर 16 नोव्हेंबरला तो क्षण आला आणि तिची ही गुड न्यूज सा-यांसमोर आली. आदितीनेही तिच्या मुलाच्या जन्मानंतर  तिचा आनंद जाहिररित्या व्यक्त केला.  आदितीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने सरवर आहुजासह लग्न केले आहे. पती सरवरनेही मुलाचे नाव ''सरताज'' असे ठेवले आहे.  मित्र, नातेवाईक आणि फॅन्सकडून या दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. त्यांच्या घरात आलेल्या या नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे आदिती आणि पती सरवर दोघे चांगलेश खुश आहेत. दोघांनी शुभेच्छा देणारे आपले हितचिंतक, मित्र आणि फॅन्सचे आभार मानलेत.


आदितीने दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. घरी लाडाने सारेच बाळाला कृष्णा नावाने आवाज देतात. कारण त्याच्याकडे पाहताच एक वेगळा आनंद मिळतो. तसेच आदिती आणि सरवर या दोघांची नोव्हेंबर महिन्यात लग्नाची अॅनिर्व्हसरी असते.  नोव्हेंबर महिन्यात या दोघांच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले आहेत. दिवसेंदिवस आमच्या दोघांचे नाते आणखीनच घट्ट होत असल्याचे तिने सांगितले. त्यातच बाळाच्या आगमनाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे तिने म्हटले आहे. 

Web Title: Aditi Sharma Hide Her Pregnancy News Now blessed with a baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.