'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला दयाबेन आणि सोनू या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत नाहीयेत. या मालिकेत दयाबेनची भूमिका दिशा वाकानी साकारत होती तर सोनूच्या भूमिकेत निधी भानुशाली होती. दिशाने तिच्या गरोदरपणात ही मालिका सोडली. दिशाला काही महिन्यांपूर्वी मुलगी झाली असून ती तिची सगळा वेळ तिच्या मुलीसोबत घालवत आहे. प्रेक्षकांची ही लाडकी दिशा कधी परतणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण त्याचसोबत या मालिकेत सोनूची व्यक्तिरेखा पुन्हा प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार यासाठी देखील प्रेक्षक आतुर झाले आहेत. निधी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असल्याचं सांगत तिने मालिकेचा निरोप घेतला. अखेर निर्मात्यांना सोनूच्या भूमिकेसाठी अभिनेत्री मिळाली असून या भूमिकेत पलक सिधवानी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

सोनूची भूमिका साकारण्यासाठी निर्माते एका नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत, अशा चर्चा ऐकायला मिळाली होती. मात्र निर्मात्यांनी सातत्याने त्या फेटाळून लावल्या होत्या. परंतु पलक सिधवानीचे नाव जाहिर झाल्यानंतर त्या चर्चा खऱ्या होत्या असे निर्मात्यांनी मान्य केलं आहे.

सोनू ही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखेंपैकी एक आहे. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी गेल्या सहा महिन्यात शेकडो मुलींचे ऑडीशन घेतले होते. त्या शेकडोंमधून पलक सिधवानीची निवड करण्यात आली आहे.


याबाबत पलक सिधवानी म्हणाली की, “मी याआधी काही टीव्ही जाहिराती व लघुपटांमध्ये काम केले होते. मात्र त्यांचे स्वरुप फार लहान होते. तारक मेहता ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी आहे. त्यासाठी लागणारी मेहनत मी करेन आणि संधीचे सोने करेन.

आता सोनूच्या भूमिकेत पलक सिधवानीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


Web Title: The actress will play the role of the daughter of Bhide in 'Tarak Mehta Ka Ulta Chashma'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.