actress sonal vegurlekar reveals she had suicida thoughts during lockdown period and went into depression | अनेकदा आत्महत्येचे विचार आलेत...!! अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरने सांगितला लॉकडाऊनचा अनुभव

अनेकदा आत्महत्येचे विचार आलेत...!! अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरने सांगितला लॉकडाऊनचा अनुभव

ठळक मुद्दे अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर शास्त्री सिस्टर मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली.

कोरोना महामारीने जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाने अनेकांनी आपले आप्त गमावले. अनेकांनी नोक-या गमावल्या, अनेकांचे धंदे बुडाले आणि अनेक जण मानसिक समस्यांत अडकले. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही.  अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनल वेंगुर्लेकर. सोनलला लॉकडाऊन आणि कोरोना काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ती इतकी खचली की, आत्महत्येचे विचारही याकाळात तिच्या मनात आले.
ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनलने हा अनुभव कथन केला आहे.

तिने सांगितले, ‘मी माझ्या पालकांसोबत राहते आणि एकुलती एक आहे. अनेकदा मी एकटी राहिली आहे. काम नसले की, माझ्या डोक्यात नकारात्मक विचारांचे काहूर माजते. लॉकडाऊनदरम्यान मी हेच अनुभवले. नव्याने काम मिळाले नाही तर? पैसे नसतील तर मी काय करेन? असे प्रश्न मला पडत. मी नैराश्यात गेले होते. अधिकाधिक नकारात्मक विचार करू लागले होते. अनेकदा तर माझ्या मनात आत्महत्येचेही विचार आलेत. पण हो, याचवेळी माझ्या आईवडिलांचा चेहराही माझ्या डोळ्यांपुढे आला. मला काही झाले तर माझ्या आईवडिलांचे काय होईल, या एका विचाराने मी स्वत:वर नियंत्रण मिळवले. कदाचित त्याकाळात माझे आईवडिल सोबत नसते तर मी आत्महत्याही केली असती. यानंतर मी अधिकाधिक सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. आज मी दु:खी असो वा आनंदी, मी  मोकळेपणाने व्यक्त होते. ’
सोनल लवकरच ‘गुप्ता ब्रदर्स - चार कुंवारे फ्रॉम गंगा किनारे’ या टीव्ही मालिकेमध्ये दिसणार आहे.  

आधी त्यांची चौकशी व्हावी
सुशांत प्रकरण आणि बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणावरही सोनल बोलली. ड्रग्ज प्रकरणात बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आलेली पाहून मी हैराण आहे. माझ्या मते, संजय दत्तसारख्या काही कलाकारांनी आधी ते ड्रग्ज घ्यायचे याची स्वत: कबुली दिली असताना सर्वप्रथम त्यांची चौकशी व्हायला हवी होती. संजय दत्तने तो ड्रग्ज घ्यायचा, अशी कबुली दिली होती. त्याच्या बायोपिकमध्येही हे दाखवले गेले आहे. पण त्याला कोणीच प्रश्न केले नाहीत. आम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा भाग आहोत. मी स्वत: अनेक ड्रग्ज पार्ट्यांबदद्ल ऐकले आहे. पण प्रत्यक्षात कधीही पाहिले नाही. इंडस्ट्रीत माझे फार मित्र नाही. जे काही आहेत, त्यांना पार्टी करायची झाल्यास मी माझ्या घरी बोलावते, असे ती म्हणाली. सुशांत प्रकरण लवकरात लवकर निकाली निघावे, असेही ती म्हणाली.

'सो कॉल्ड श्रीमंत लोक मनानेही श्रीमंत होऊ देत', आर्थिक तंगीत सापडलेल्या अभिनेत्रीला मेकअपमॅनने केली मदत 

मालिकेत काम करायचे असेल तर व्हावे लागेल नग्न , या मराठी अभिनेत्रीने सांगितली होती आपबीती
 
 अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर शास्त्री सिस्टर मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. सोनलने 'शास्त्री सिस्टर्स', 'ये वादा रहा' आणि 'साथ दौंड भिडे' अशा बर्‍याच मालिकांमध्ये काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actress sonal vegurlekar reveals she had suicida thoughts during lockdown period and went into depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.