स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. मात्र बाहेरून जितकी ही इंडस्ट्री ग्लॅमरस दिसते तसे नसून अनेकांना कटु प्रसंगांनाही तोंड द्यावे लागते. मालिकांमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी सोनल मूळची मुंबईची. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली. याच दरम्यान एका मालिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी सोनल गेली.मात्र यावेळी तिची निवड झाली नाही. त्यावेळी अवघ्या १९ वर्षाची असणाऱ्या सोनलला राजा बजाजने खोलीत बोलावून घेतलं. 


मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या बजाजने एक डिमांड केल्याची कटू आठवण सोनलने सोशल मीडियावर शेअर केली  होती. “अभिनय येत नसला तरी तू दिसायला सुंदर आहेस. त्यामुळे तुझी काम करायची इच्छा असेन तर काम द्यायला तयार आहे फक्त तू नग्न होऊन माझ्यासमोर ये” असं बजाजनं सांगितल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटलं होते. तो इतक्यावरच थांबला नाही तर तुला तांत्रिक विद्या शिकवेन असं सांगत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने नमूद केले होते.

 

यामुळे भेदरलेल्या सोनलने आरडाओरडा करत तिथुन पळ काढला होता. त्यावेळी ऑडिशनसाठी आलेली एक मॉडेल आणि तिच्या आईने साथ दिल्याचे तिने सांगितलं. त्यांना सोबत घेऊन पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांनी लेखी जबाब घेतला होता. मात्र याप्रकरणी पोलिसांनी भलतीच केस दाखल करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली असा आरोप सोनलने पोस्टमधून केला होता. सोनलने दिल दोस्ती डान्स, शास्त्री सिस्टर्स, ये वादा रहा आणि शास्त्री सिस्टर्स अश्या मालिकांमध्ये काम केले आहे. 


Web Title: When Actress Sonal Vengurlekar was asked to become nude if wanted to act on serial, Read Details
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.