'माझ्या नव-याची बायको' मालिकेत काही एपिसोडसाठीच संजना व्यक्तिरेखेचा मालिकेत समावेश करण्यात आला होता. ही भूमिका मीरा जगन्नाथने साकारली होती. मालिकेत काही एपिसोडमुळे एंट्री केलेली संजना  आजही रसिकांच्या लक्षात आहे.  विशेष म्हणजे रूपेरी पडद्यावर तिचे दर्शन घडत नसलं तरीही सोशल मीडियावर मात्र तिची बरीच चर्चा होते.  तिचा रिअल अंदाजही चाहत्यांना खूप भावतो. सध्या मीराने केलेले फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.


मीरा जगन्नाथ मॉडेलिंग क्षेत्रात असल्यामुळे तिचे फोटो लक्षवेधून घेतात. रॉकिंग आणि स्टनिंग स्टाईलसह चेह-यावरील घायाळ करणारे स्माईल यामुळे मीराच्या या फोटोंचीही सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगते. सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो आहे. याआधीही मीराचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. 


नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या याच फोटोची चर्चा रंगली आहे.यातील एका फोटोत मीराचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात हा फोटो आहे. मीराच्या या बिकीनी फोटोंना नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

Web Title: Actress Mira Jagannath Sexy Moves On Internet Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.