this actress left Aai Kuthe Kay Karte serial, this is reason | 'आई कुठे काय करते' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण वाचून व्हाल हैराण

'आई कुठे काय करते' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण वाचून व्हाल हैराण

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठं काय करते मालिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. लॉकडाउनमुळे या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते. त्यामुळे तीन महिने मालिकेचे प्रसारणही थांबले होते. त्यानंतर अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा मालिकेचे नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र नवीन एपिसोडमधील सुरूवातीचे काही एपिसोडनंतर मालिकेतील पुढील एपिसोड पाहताना प्रेक्षकांना धक्का बसला. याचे कारण म्हणजे या मालिकेतील संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपाली पानसरे ऐवजी अभिनेत्री रुपाली भोसले पहायला मिळाली. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

आई कुठे काय करते मालिकेत संजना आणि अनिरुद्ध यांचे प्रेम प्रकरण घरापर्यंत आल्यामुळे मालिका इंटरेस्टिंग वळणावर आली आहे. मात्र या मालिकेत संजनाची भूमिका बदलली गेल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपाली पानसरे हिने मालिका सोडली असल्याचे समजते आहे.

लॉकडाउननंतर प्रसारीत झालेल्या दोन भागांमध्ये ती दिसल्यानंतर तिच्या जागी रुपाली भोसलेची वर्णी लागल्याचे प्रेक्षकांना कळल्यावर ते नाराज झाले आणि त्यांनी दीपालीला सोशल मीडियावर मालिका का सोडल्याचे विचारले. त्यावर तिने प्रतिक्रियादेखील दिली.

दीपालीने सांगितले की,सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे आणि त्यात मला तीन वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे काळजी घेणे माझी जबाबदारी आहे. म्हणून मी मालिकेतून बाहेर पडते आहे.  आता संजनाच्या भूमिकेला रुपाली भोसले कितपत न्याय देते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: this actress left Aai Kuthe Kay Karte serial, this is reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.