आपल्याला सगळं काही मिळू शकतं पण मनाची शांती मिळण्यासाठी ही कलाकार मंडळी काय करतील याचा नेम नाही...मनाची शांती मिळावी यासाठी कविता कौशिक सा-यांनाचा योगा करण्याचा सल्लाही देते. योगा करतानाच्या सेक्सी आणि हॉट पोज देत ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. यामुळेच सोशल मीडियावर तिचा 6 लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे. सुंदर आणि फीट दिसणं यासाठी टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक खूप मेहनत घेते . ती दिवसाची सुरुवात योगा ने करते. मात्र ती पोस्ट करत असलेल्या फोटोंवर नेटीझन्सच्या कमेंटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 


तिचे असे फोटो पोस्ट करणे हे तिच्या चाहत्यांना रूचलेले दिसत नाही. त्यामुळे तिच्यावर तीव्र शाब्दिक टीकाही केली जात आहे. एका युजरने तर म्हटले की, योगा पोझेस कमी सेक्सी पोजेसच जास्त दाखवत सा-यांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्नात कविता कौशिक दिसते. त्यामुळे कविताला कौशिकच्या चाहत्यांकडून नाराजीचा सूर असल्याचे समोर आले असूनही कविताला या गोष्टीचा फरक पडत नसल्याचेही तिने म्हटले होते.


लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते. मी माझ्या मुलावर कुठलाही अन्याय करू इच्छित नाही. 40 व्या वर्षी मी आई होणार असेल तर माझा मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत मी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असेन. केवळ 20 व्या वर्षी माझ्या मुलावर त्याच्या म्हाता-या आई - वडिलांची जबाबदारी यावी हे मला नको आहे असे कविताने सांगितले होते.

Web Title: Actress Kavita Kaushik Becomes A Sex symbol in the name of yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.