Actress diljit raised funds for corona patients by auctioning pictures | कौतुकास्पद ! अभिनेत्री दिलजीत चित्रांचा लिलाव करुन कोरोना रुग्णांसाठी उभारणार निधी

कौतुकास्पद ! अभिनेत्री दिलजीत चित्रांचा लिलाव करुन कोरोना रुग्णांसाठी उभारणार निधी

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. या कठीण काळात प्रत्येकजण आपापल्या परीने  निधी उभारून मदतीचा हात पुढे करत आहे. अभिनेत्री दलजित कौरने देखील आपली आवडती चित्रे विक्रीसाठी ठेवून  निधी उभारण्याचे ठरविले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन सुंदर चित्रे पोस्ट केली आहेत. तिने असेही लिहिले कि, “जर माझ्याकडे अजून चित्रे असती तर अजून मोठी मदत निर्माण होऊ शकली असती. मला माहित नाही सध्या काय करणे योग्य आहे. आज हजारो लोक आयुष्याशी झुंज देत आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे.अशावेळी मला  वाटले कि माझ्या या चित्रांचा लिलाव करून, ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी मी थोडीफार आर्थिक मदत नक्कीच उभी करू शकते. ही चित्रे मी अत्यंत प्रेमाने काढलेली असून माझ्या घरीच कित्येक काळापासून आहेत. पण आता त्यांचा योग्य वापर करण्याची वेळ आली आहे.जास्तीत जास्त किंमतीमध्ये ही चित्रे विकून त्यातून मिळणारे पैसे दान करण्याचा माझा हेतू आहे.

लोकमतशी बोलताना, “जर माझ्याकडे अजून चित्रे असती तर अजून मोठी मदत उभी केली असती. मला माहिती नाही सध्या काय करणे योग्य आहे. आज हजारो लोक आयुष्याशी लढा देत आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. अशावेळी मला  वाटले कि माझ्या या चित्रांचा लिलाव करून, ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी मी थोडीफार आर्थिक मदत नक्कीच उभी करू शकते.

अनेक सेलिब्रिटींनी दलजितचे कौतुक केले आहे. रश्मी देसाईने तिच्या पोस्ट वर कमेंट करत म्हटले कि, “तुझ्या या कार्याला माझा सलाम आहे. मला माहित आहे कि ही चित्रे तुझ्या किती जवळची आहेत आणि ती तयार करताना तू किती मेहनत घेतली आहेस.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress diljit raised funds for corona patients by auctioning pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.