छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बते' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. आता या मालिकेचे निर्माते या मालिकेचा दुसरा सीझन ये है चाहते घेऊन येत आहेत. याचा फर्स्ट प्रोमोदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र ये है मोहब्बते मालिकेचे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. तर कलाकारदेखील नर्व्हस झाले आहेत. 


ये है मोहब्बते मालिकेत दिव्यांका त्रिपाठी व करण पटेल मुख्य भूमिकेत होते. ही मालिका निरोप घेणार असल्याचे समजल्यामुळे करण पटेल खूप उदास झाला आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 


करणने त्याचा दिव्यांकासोबतचा फोटो शेअर करत या मालिकेतील सर्व कलाकार व टीमचे आभार मानले आहेत. करणने भावनिक होत लिहिले की, प्रत्येक चांगली गोष्ट एक दिवस संपते. आता ये है मोहब्बते मालिकेची निरोप घेण्याची वेळ आली आहे. माझ्यासाठी ही फक्त मालिका नाही. माझ्यासाठी घर आहे. जिथे माझे कुटुंब व मित्रमंडळी आहेत. इथेमला अली, अभिषेक, संग्राम व राज सारखे भाऊ व सर्वात महत्त्वाचे सासरे. ६ वर्षांचे हे कनेक्शन मी शब्दांत सांगू शकत नाही.


करणने पुढे लिहिले की, आम्ही सिंपल पण स्ट्राँग कन्सेप्टसोबत सुरूवात केली ज्याला लोकांनी भरभरून प्रेम दिले. रमन भल्लाला घराघरात ओळख मिळाली. मी त्या सर्व लोकांचे आभार मानतो ज्यांनी मला रमण भल्ला उर्फ रावण कुमार (जे दिव्यांका बोलते) बनविले. या मालिकेनं मला चांगला व्यक्ती बनवले. मला ऑनस्क्रीन ६ वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारण्याचा अनुभव मिळाली. मला वाटतं की खऱ्या आयुष्यात मी वडील बनण्यासाठी तयार आहे. एकता कपूरचे जितके आभार मानेन तितके कमीच आहे. त्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला. रमन व इशिताच्या चाहत्यांचा मी आभारी आहे ज्यांनी आम्हाला इतके प्रेम दिलं. करण पटेल उर्फ रमन भल्लाकडून खूप सारे प्रेम.

Web Title: Actor Karan Patel Wrote An Emotional Instagram Post As Tv Show Yeh Hai Mohabbatein Is Going off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.