छोट्या पडद्यालक एक डॉन अवतरणार आहे. 'डॉक्टर डॉन' ही नवी मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव 'डॉक्टर डॉन' असलं, तरी या मालिकेचं स्वरूप मात्र विनोदी असणार आहे. पौराणिक मालिकेत खंडेरायाच्या भूमिकेत झळकलेला  अभिनेता देवदत्त नागे  या मालिकेत थेट डॉनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका डॉनचं आयुष्य, त्याच्या भोवतालची परिस्थिती, जवळच्या माणसांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड यावर ही मालिका आधारित असणार आहे.


तब्बल  २ वर्षानंतर पुन्हा एकदा देवदत्त नागे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.तसेच  मालिकेतील त्याच्या लुकसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. लवकरच या मालिकेचे शूटिंग सुरू होणार आहे. खंडेरायाच्या भूमिकेत दिसलेल्या देवदत्तसाठी, विनोदी मालिकेतील डॉनचे पात्र साकारणे नक्कीच आव्हानात्मक असेल. अर्थात, देवदत्तसारखा दमदार कलाकार हे आव्हान नक्कीच पेलू शकतो. 

याविषयी बोलताना तो म्हणतो;"विनोदी प्रकारात मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे या रोलसाठी मला विचारलं याचा आनंद झाला होता. या मालिकेत मला डॉनचं काम करावं लागणार आहे. त्यातच एक विनोदी छटा सुद्धा जपावी लागणार आहे. त्यामुळेच माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक असणार आहे. मला नवनवीन प्रकारच्या भूमिकांचं आव्हान पेलायला खूप आवडतं.

विनोदी मालिका, हे आव्हान माझ्यासाठी खूपच छान असेल. मला डॉनच्या भूमिकेत पाहायला माझ्या चाहत्यांना सुद्धा खूपच आवडेल यात काहीच शंका नाही. ही नवी मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री वाटते. माझ्या इतर भूमिकांवर चाहत्यांनी जसं भरभरून प्रेम केलं तसंच याही भूमिकेला प्रेम मिळेल अशी माझी इच्छा आहे." 

Web Title: Actor Devdatta Nage New Marathi Serial, know The Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.