झी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी सादर करते. लोकांना गंडवण्यात कायम तत्पर असलेल्या दोन ठगांची गोष्ट असलेली 'अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी' हि मालिका झी मराठीवर नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आणि अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला.

'लागिरं झालं जी' मालिकेतून रसिक-प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी शीतली म्हणजेचं अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता चेतन वडनेरे या मालिकेत प्रमुख भूमिका निभावत आहेत. हि जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतेय. ‘शीतली’ या भूमिकेमुळे लोकप्रिय ठरलेल्या शिवानीसोबत काम करायचे म्हटल्यावर चेतनला थोडेफार दडपण आले होते.

त्याबद्दल बोलताना चेतन म्हणाला, "अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी या मालिकेच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच भेटलो. पण मी शिवानीचं काम, तिचा अभिनय पाहिला होता. तिचा फॅनक्लब ही खूप मोठा आहे. त्यामुळे मला थोडे दडपण आले होते. पण सगळेच उलटे घडले.

स्क्रिप्टच वाचन करतानाच माझ्या मनावरील दडपण निघून गेले. कारण शिवानी आज घराघरात पोचलेली असली किंवा प्रसिद्ध असली तरी ते समोरच्याला जाणवू देत नाही. आमच्या मालिकेचे काही भाग भोरमध्ये शूट झाले. मालिकेची संपूर्ण टीम एकाच हॉटेल मध्ये राहायची त्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर बराच वेळ मिळाला, खरेतर म्हणूनच आमची घट्ट मैत्री झाली."
 

Web Title: Actor chetan was nervous while working with shivani baokar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.