Actor Ashiesh Roy Is Still Critical And Trying To Reach Salman khan For Some Monetary Help | आर्थिक अडचणीत आशिष रॉय, उपचारासाठीही नाहीत पैसै,सलमानकडे करणार मदतीची याचना

आर्थिक अडचणीत आशिष रॉय, उपचारासाठीही नाहीत पैसै,सलमानकडे करणार मदतीची याचना

'ससुराल सिमर का' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमध्ये झळकलेल्या आशिष यांचे मूत्रपिंड खराब आहे.  त्यांच्या शरीरात पाणी जमले आणि पाय सुजले आहेत.  आशिष रॉय यांनी आर्थिक अडचणीमुळे उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आशिष रॉय यांचे ५४ वय आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता उपचारासाठी आर्थिकमदतीची त्यांनी मागणी केली आहे. या वाईट काळात मला कुणीही साथ देत नाहीये. मी एकटाच याचा सामना करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आयसीयूमध्ये दाखल असल्याची बातमी स्वतः आशिष यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आणि चाहत्यांकडे आर्थिक मदतीची विनंती केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये इंडस्ट्रीतील अन्य कलाकारांकडेही आर्थिक मदत मागितली आहे, पण आतापर्यंत  कुणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आलेला नाही.

"माझे डायलिसिस चालू आहे पण तब्येतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मला माहित नाही की मी येथे किती काळ उपचार घेऊ शकेन कारण रुग्णालयाचे बिल प्रत्येक वाढत्या दिवसाबरोबर वाढतच आहे. दोन दिवसांचे बिल जवळपास दोन लाख रुपये झाले आहे. सलमानच्या बीइंग ह्यूमन या एनजीओ मार्फत  गरजुंना नेहमी  मदत करत असतो. त्यामुळे आशिष यांनाही सलमानने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच  माझी अवस्था पाहून सलमान नक्कीच मदतीसाठी पुढे  येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Actor Ashiesh Roy Is Still Critical And Trying To Reach Salman khan For Some Monetary Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.