Abhishek and anagha will get engaged in aai kuthe kay karte | 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याची धूम, सुंदर फोटो आले समोर

'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याची धूम, सुंदर फोटो आले समोर

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीच्या सुनेचं आगमन झालंय. अभिषेक अनघाच्या साखरपुड्याची धामधूम लवकरच आपल्या या मालिकेच्या येत्या एपिसोडमध्ये पाहयाला मिळणार आहे. या दोघांचा साखरपुडा धुमधड्याक्यात पार पडलाय.अभी आणि अनघाचा साखरपुडा असल्यामुळे यश इशा गौरी छान सजले आहेत आणि यात आजी पण मागे नाही.आपल्या लाडक्या भावाचा साखरपुडा असल्यामुळे यश आणि इशाने गौरीसह ताल धरलाय.

या एन्गेजमेंटला डान्स मस्तीदेखील पाहायला मिळणार आहे. अभी अनघाचा साखरपुडा संपन्न होत असल्यामुळे अरुंधती भलतीच खूष आहे... कारण या दोघांच्या लग्नाला अनिरुध्द आणि आजीचा खूपच विरोध होता..अनघा ही डिव्होर्सी होती तसंच अभीपेक्षा वयाने खूप मोठी असल्यामुळे आजीचा या लग्नाला विरोध होता. तर अनिरुध्दला अभीचं लग्न अंकिताशी करून द्यायचं होतं. पण अंकिताने अभीशी झालेली एन्गेजमेंट मोडल्यानंतर अभी नंतर परत तिच्याकडे गेलाच नाही.

 

अंकिता या ना त्या कारणाने अभीला क्नव्हेंन्स करण्याचा प्रयत्न करत राहिली पण अभी अनघाशी लग्न करण्यावर ठाम राहिला. अनघादेखील पुन्हा लग्न करण्यासाठी तयार नव्हती. पण अखेर अरुंधती आणि अभि तिला समजावतात आणि अखेर अनघा या लग्नाला तयार होते. पण अजूनही अंकिताने हार काही मानलेली नाही त्यामुळे अभि अनघाच्या या मोस्ट अवेटेड एन्गेजमेंटमध्ये ती काही विघ्न तर आणणार नाही ना याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे..
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abhishek and anagha will get engaged in aai kuthe kay karte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.