अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर आपल्या मुलाला अज्ञात ठिकाणी नेल्याचा आरोप लावला आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखती दरम्यान अभिनव म्हणाला की तो आपल्या 4 वर्षाच्या मुलगा रेयांशबद्दल खूप चिंतेत होता.

श्वेता तिवारीच्या चाहत्यांनी  मुलाला त्यांच्याकडे परत पाठवण्यास सांगावे असे आवाहन केले आहे. रियांश आणि श्वेतापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले पण श्वेता मुलाला भेटु देत नाही म्हणून त्याला मुलाची चिंता सतावतेय. 

अभिनव पुढे म्हणाला, 'तो 40 दिवस आपल्या मुलाबरोबर होता जेव्हा श्वेता कोरोना पॉझिटिव्ह होती  तेव्हा  श्वेताची आई आणि मुलगी पलकने रेयांशची काळजी घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी माझ्या आईने माझ्या मुलाची काळजी घेतली. अभिनवने श्वेतावर पोलिसांना बोलवून धमकावल्याचा आरोप केला आहे. तसेच श्वेताने तिला नवीन खेळणी देऊन, आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला.

आता ती त्याच्याबरोबर कुठेतरी गेली आहे.अभिनव पुढे म्हणाला की श्वेता रेयानला काही न सांगताच निघून गेली आहे. माझ्यापासून लांब घेवून गेली आहे. अभिनवने असेही म्हटले आहे की, श्वेताने सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे आणि 5 दिवसांपासून तो आपल्या मुलाला भेटलाही नाही.

अभिनवने श्वेताच्या तिच्या दाव्यांचे खंडन केले ज्यामध्ये आहे. तो तिच्याशी संपर्कात नव्हता. पण आता मुलाला भेटण्यासाठी मी व्याकुळ झालो आहे. एकीकडे अभिनव कोहली सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेताच्या संपर्कात असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे श्वेता सांगत आहे की, ती अभिनवपासून दूर तिच्या मुलांसोबत राहत आहे. त्यामुळे दोघांमध्ये नेमके काय सुरूय याविषयी उलट सुलट चर्चा सुरू असतात. 

2012 श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर अभिनव कोहलीच्या ती प्रेमात पडली 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2013 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abhinav kohli Says Sons Reyansh Disappearance Accuses Wife Shweta Tiwari Of Taking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.