'तुम गिरी हुई थीं, और गिरती जा रही हो..', श्वेता तिवारीवर अभिनय कोहलीने केला पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:14 PM2021-05-10T13:14:08+5:302021-05-10T13:19:33+5:30

अभिनवने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्वेता तिवारी जोरादर हल्ला चढवला आहे.

Abhinav kohli hits back on shweta tiwari claim of not contributing a penny for son reyansh | 'तुम गिरी हुई थीं, और गिरती जा रही हो..', श्वेता तिवारीवर अभिनय कोहलीने केला पलटवार

'तुम गिरी हुई थीं, और गिरती जा रही हो..', श्वेता तिवारीवर अभिनय कोहलीने केला पलटवार

Next

नुकतीच श्वेता तिवारी (Shweta Tiwari) 'खतरों के खिलाडी 11'  (khatron ke khiladi season 11) च्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. यानंतर पती अभिनव कोहली  (Abhinav Kohli)चा असा आरोप आहे की श्वेता आजारी रेयांशला मुंबईतील हॉटेलमध्ये सोडून निघून गेली. यानंतर श्वेता तिवारीने सांगितले की, ती रेयांशला कुटुंबीयांकडे जबाबदारीने सोडून गेली आहे आणि अभिनववर बेजबाबदार वडील असल्याचा आरोप केला. यानंतर अभिनवनेही श्वेतावर पलटवार केला आहे.

अभिनवने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्वेता तिवारी जोरादर हल्ला चढवला आहे.अभिनवने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'जेव्हा मी अर्जुन बिजलानीसोबत शो करत होतो, ज्यांच्यासोबत तू पण केपटाऊनमध्ये आहेस. मी आणखी दोन बालाजी शो केले आणि अलीकडे माझ्या अकाऊंटमधून तुझ्या अकाऊंटमध्ये 40% रक्कम ट्रान्सफर केली आणि आता तू म्हणतेस मुलांचा सगळा खर्च तू एकटी करते आहेस. तू  आधीपासूनच खालच्या पातळीची आहेस आणि आता तू आणखी खालच्या पातळीला उतरली आहेस.  

 
श्वेताने काय केले होते आरोप?
श्वेताने आपल्या मुलाखतीत सांगितले, 'मी अभिनवला फोनवरून सांगितले आहे की मी केपटाऊनला जात आहे आणि रेयांश त्याच्या कुटुंबासोबत पूर्णपणे सुरक्षित आहे. माझी आई, नातेवाईक आणि माझी मुलगी पलक तिची काळजी घेत आहेत. तसेच रेयांशला मी शूटिंगच्यामध्ये व्हिडिओ कॉल करत असते. मी अभिनवला सर्वकाही चांगल्या प्रकारे समजावून सांगितले होते पण जेव्हा अभिनवने व्हिडिओ पोस्ट केला तो पाहून मी हैराण झाले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abhinav kohli hits back on shweta tiwari claim of not contributing a penny for son reyansh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app