पोलिसांना बोलवून मला घरातूनबाहेर काढले, अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:44 PM2020-07-01T12:44:55+5:302020-07-01T12:52:22+5:30

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे.

Abhinav kohli accuses wife shweta tiwari says not letting son meet | पोलिसांना बोलवून मला घरातूनबाहेर काढले, अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर केले गंभीर आरोप

पोलिसांना बोलवून मला घरातूनबाहेर काढले, अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर केले गंभीर आरोप

Next

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. पती अभिनव कोहलीसोबत भलेही दोघे एका घरात राहतायेत मात्र त्यादोघांमध्ये मतभेद आहेत. अभिनवने श्वेताबरोबर त्याच्या चॅटचा  स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला.

कोहलीने श्वेता आणि तिचा 'मनफोडगंज की बिन्नी' सहकलाकार फहमान खानचा व्हिडिओही पोस्ट केला होता. जो पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. अभिनवने श्वेता आणि तिची मुलगी पलकच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर देखील नाराजी व्यक्त केली होती.

अभिनवचा आरोप आहे की, श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत नीट वागत नाहीय. अनेक दिवसांपासून त्याला मुलगा रेयांशला भेटण्याची परवानगीही दिली नाहीय. काही दिवसांपूर्वी श्वेता तिवारीने अभिनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता. ज्यानंतर अभिनवर विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. अभिनव आणि श्वेताने 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह केला होता. दोघांचा वर्षांचा एक मुलगादेखील आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abhinav kohli accuses wife shweta tiwari says not letting son meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app