Abhijna bhave enjoying an adventure trip with her husband, video goes viral on social media | पतीसोबत अ‍ॅडव्हेंचर ट्रिप एन्जॉय करतेय अभिज्ञा भावे, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पतीसोबत अ‍ॅडव्हेंचर ट्रिप एन्जॉय करतेय अभिज्ञा भावे, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अभिज्ञा भावे जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. मेहुल पै याच्यासोबत अभिज्ञाने लग्नगाठ बांधली. अभिज्ञाच्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.


अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच तिने आपल्या ट्रॅव्हलिंग डायरीतील काही व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केलेत. ज्यात ती पती मेहुल पैसोबत चांगलीच भटकंती करताना दिसतेय आहे. अभिज्ञा आणि मेहुल दोघांनी अनेक अ‍ॅडव्हेंचर ठिकाणांना भेट देत एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड केला. सध्या दोघे ऋषिकेशला आहेत.  दोघांनी तिकडे काय धम्माल केलीये हे या व्हिडिओतून पाहायला मिळतंय.. 

ऋषिकेशला जाण्याआधी उत्तराखंडमध्ये सुद्धा गेलं होतं. तेथील काही पर्यटन स्थळांना या दोघांनी भेट दिलीय.. मुसोरी या ठिकाणी अभिज्ञा आणि मेहुल यांनी क्वालिटी टाईम स्पेंट केला.

‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. 2010 साली ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abhijna bhave enjoying an adventure trip with her husband, video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.