ठळक मुद्दे‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अभिज्ञा भावे गेल्या जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. मेहुल पै याच्यासोबत अभिज्ञाने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हे जोडपे आनंदात संसार करत असताना काही सोशल मीडिया युजर्सनी मात्र अभिज्ञाला ट्रोल करायला सुरुवात केली. हे अभिज्ञाचे दुसरे लग्न. यावरून ट्रोलर्सनी अभिज्ञाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले. ट्रोलर्सला दिलेल्या या उत्तराचा स्क्रिनशॉट तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

पहिला पतीला का सोडलं? असा डिवचणारा प्रश्न एका ट्रोलरने अभिज्ञाला केला. युजरच्या या प्रश्नाने अभिज्ञा भडकली. ‘तुम्ही माझी मालिका टीव्हीवर बघता, आयुष्य नाही. देव तुमच्यावर अशी वेळ आणू नये, ही प्रार्थना,’ असे तिने या युजरला सुनावले. अन्य एका ट्रोलरनेही तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘देवानी मन:शांती तुझ्या पहिल्या नव-याला दिलीये. आता ह्या नव-याला मिळो म्हणजे झालं.. आणि त्याला योगसाधना शिकव, बाकी सगळं माहित आहे आम्हाला. बघूच पुढे आम्ही मज्जा,’ असे या ट्रोलरने लिहिले. या ट्रोलर्सच्या पोस्टचे स्क्रिनशॉट्स शेअर करत, अभिज्ञाने आपला संताप व्यक्त केला. ‘असंवेदनशील माणसं. दुर्दैवाने माझेच मराठी बांधव’, असे तिने लिहिले.

अभिज्ञाच्या दुस-या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती.
2014 साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली. 2010 साली ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: abhidnya bhave trolled her second marriage and she gives befitting reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.