ठळक मुद्देअर्चनाने सांगितले, मी अभयला अनेकवेळा लाडू खाण्यासाठी आग्रह करत होते. पण अभयने मात्र डाएट मोडून लाडू खाण्यास नकार दिला. त्याला लाडू खाण्यासाठी तयार करणे आमच्यासाठी खूप कठीण होते.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. त्यामुळे आता नेटफ्लिक्सवरील ‘चॉपस्टिक्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभय देओल आणि मिथिला पालकर या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन कपिलच्या टीमसोबत धमाल मस्ती करणार आहेत. पण त्याचसोबत अनेक सिक्रेट देखील शेअर करणार आहेत. 

अभिनेत्री अर्चना पुरण सिंह द कपिल शर्मा शोचा एक भाग आहे. तिने अभय देओलसोबत ‘ओए लकी! लकी ओए!’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा तिने या कार्यक्रमाच्या सेटवर सांगितला. ती सांगते, चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभय डाएट करत होता. मी त्याला अनेकवेळा लाडू खाण्यासाठी आग्रह केला होता. पण अभयने मात्र डाएट मोडून लाडू खाण्यास नकार दिला. त्याला लाडू खाण्यासाठी तयार करणे आमच्यासाठी खूप कठीण होते. कारण तेव्हा तो त्यावेळी त्याच्या एका आगामी चित्रपटासाठी डाएट करत होता. हा त्याचा आगामी चित्रपट ‘देव डी’ असून या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. 

काही वर्षांपूर्वी अभय लाडू खाण्यास नकार देत असला तरी आता तो खुशाल लाडूवर ताव मारतो. त्यामुळे त्याच्यासाठी खास लाडू द कपिल शर्मा शोच्या सेटवर मागवण्यात आले होते. आपण सगळे आपल्या हाताने लाडू खाण्याचा आनंद घेतो. पण अभयने मात्र लाडू खाण्याची अनोखी पद्धत शोधली. त्याने लाडू खायला चॉपस्टिक्सचा वापर केला. आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत त्याने चॉपस्टिक्सने लाडू खाल्ला.

कपिल शर्माने चॉपस्टिक्स या चित्रपटातील बकरीची काळजी तू नीट घेत होता की नाही असे विचारले असता त्याने सांगितले की, त्या बकरीच्या मेकअपसाठी आणि तिचे खाणेपिणे सांभाळण्यासाठी वेगळी टीम होती. 


 
‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा हा भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 9.30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.   

Web Title: Abhay Deol's conflict with Ladoos revealed on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.