लॉकडाउनमुळे या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते.  त्यानंतर अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा मालिकेचे नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.‘आई कुठे काय करते’ अल्पावधीतच या मालिकेने रसिकांची भरघोस पसंती मिळवली. वेगवेगळ्या रंजक वळणामुळे मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे.  लवकरच मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. निमित्तही खास आहे या दोघांच्याही लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. त्यामुळेच संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन या दोघांचं लग्न पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेतलाय. 

 

अर्थात यात पुढाकार घेतला तो यश, इशा आणि अभिषेकने. आई- बाबांचं केळवण करण्यापासून ते अगदी मेहंदी, हळद, संगीत असे सगळे कार्यक्रम साग्रसंगीत पार पडले. आता उत्सुकता आहे ती अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या लग्नाची.  दोघांचा लग्नातला हा खास लूक असणार आहे. पारंपरिक वेषातला दोघांचाही अंदाज लक्ष वेधणारा आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, पारंपारिक दागिने असा वधूच्या रुपातला अरुंधतीचा लूक याआधी रसिकांनी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे मालिकेतला हा लग्नसोहळा खास ठरणार हे मात्र नक्की. रसिकांना या आठवड्यात हा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. 

 

हे लग्न रिल लाइफमध्ये होणार असले तरी रिअल लाइफप्रमाणे लग्नासारखेच पार पडणार आहे. कसल्याही गोष्टीची कमी मालिकेच्या टीमने बाकी ठेवलेली नाही यासाठी जय्यत तयारीही सुरु झाली आहे. घरात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे या दोघांच्या लग्नाची धामधूम सुरु असताना संजना आणि अनिरुद्धच्या नात्याचाही उलगडा होणार की काय अशी परिस्थीती निर्माण झालीय. या दोघांच्या नात्याबद्दल हळूहळू सर्वांनाच कल्पना येऊ लागली आहे.


लग्नाच्या निमित्ताने जरी संपूर्ण कुटुंब आनंदात असलं तरी हा आनंद किती दिवस टिकणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल, कारण अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी हळूहळू सर्वांनाच कळलं आहे. अरुंधतीसमोरही हे सत्य उघड होणार आहे. त्यामुळे हे सत्य अरुंधती कसं पचवणार? तिच्या आयुष्याला नेमकी कशी कलाटणी मिळणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aai Kuthe Kay Karte : Twist in Aniruddha And Arundhati's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.