'आई कुठे काय करते'मधील अविनाशच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:00 AM2021-09-21T07:00:00+5:302021-09-21T07:00:00+5:30

अविनाश देशमुखची भूमिका अभिनेता शंतनु मोघेने साकारली आहे. त्याची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'Aai Kuthe Kay Karte' fame Avinash Aka Shantanu Moghe's real life wife is also famous Actress | 'आई कुठे काय करते'मधील अविनाशच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'आई कुठे काय करते'मधील अविनाशच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Next

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अविनाश देखमुख या पात्राची उशीरा एन्ट्री झाली. पण या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अविनाश देशमुखची भूमिका अभिनेता शंतनु मोघेने साकारली आहे. शंतनु मोघेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. शंतनुची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिनेता शंतनु मोघेच्या पत्नीचे नाव आहे प्रिया मराठे.प्रिया मराठे हे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत काम करते आहे.

या सुखांनो या या मालिकेतून प्रिया मराठेने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केले. तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका खूप गाजली.

याशिवाय कसम से या मालिकेतून तिने हिंदी मालिकांमध्ये पदार्पण केले.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. 'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही ती झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही ती दिसली.


तर अभिनेता शंतनु मोघेने स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिके त छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

तसेच श्री राम समर्थ या चित्रपटात त्याने काम केले आहे. याशिवाय त्याने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने नाटकातही काम केले आहे.

Web Title: 'Aai Kuthe Kay Karte' fame Avinash Aka Shantanu Moghe's real life wife is also famous Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app