'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:59 PM2021-09-24T14:59:15+5:302021-09-24T14:59:38+5:30

अनघाच्या लग्नानंतरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

Aai Kuthe Kay Karte fame Anagha's post-wedding look photo goes viral | 'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल

'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल

Next

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या मालिका नव्या वळणावर आली आहे. अरूंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाला असला तरी सध्या अरूंधती देशमुख कुटुंबियांसोबतच राहत आहे. तर संजना आणि अनिरुद्धचे लग्न झाले आहे आणि तेदेखील समृद्धी बंगल्यात राहत आहेत. संजनाचा मुलगा निखिलदेखील त्यांच्यासोबत राहत आहे. त्यामुळे घरात सतत काहीना काही कुरबूर सुरूच असते. दरम्यान आता पुन्हा एकदा अभिषेक आणि अनघा यांच्यात जवळीक वाढताना दिसते आहे. त्यामुळे प्रेक्षक ते दोघे लग्न कधी करतात, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान आता अनघाच्या लग्नानंतरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारली आहे. अश्विनी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर अनघाच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे आणि तिने लिहिले की, अनघा. तिचा हा फोटो मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णीने काढला आहे.

या फोटोत अश्विनीने साडी नेसली आहे. नाकात नथ, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेले दिसत आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर अनघाचा हा लग्नानंतरचा लूक असल्याची चर्चा होताना दिसते आहे आणि हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

मात्र या फोटोत अश्विनीने हॅशटॅगमध्ये हा अनघाचा लूक स्वप्नातील सीक्वेन्समधील असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अभिषेक आणि अनघाचे लग्न कधी होणार हे जाणून घेणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte fame Anagha's post-wedding look photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app