'आई कुठे काय करते' मालिकेतील या अभिनेत्रीने सुरू केला नवा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 05:36 PM2021-09-21T17:36:44+5:302021-09-21T17:37:04+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील असे बरेच कलाकार आहेत जे आपली अभिनयाची आवड जोपासत इतर व्यवसायदेखील करताना दिसत आहेत.

Aai Kuthe Kay Karte Fame this actress started a new business | 'आई कुठे काय करते' मालिकेतील या अभिनेत्रीने सुरू केला नवा बिझनेस

'आई कुठे काय करते' मालिकेतील या अभिनेत्रीने सुरू केला नवा बिझनेस

Next

मराठी चित्रपटसृष्टीतील असे बरेच कलाकार आहेत जे आपली अभिनयाची आवड जोपासत इतर व्यवसायदेखील करताना दिसत आहेत. आई कुठे काय करते मालिकेतील अरूंधतीच्या मैत्रीण देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका देशपांडे हिनेदेखील नव्या बिझनेसला सुरूवात केली आहे. याबद्दल नुकतेच तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.

आई कुठे काय करते मालिकेत देविकाची भूमिका अभिनेत्री राधिका देशपांडे हिने साकारली आहे. ती उत्तम अभिनेत्रीसोबत उत्तम लेखिका, दिग्दर्शिका आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून राधिकाने तेजश्री प्रधानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

मधल्या काळात तिने स्वतःच्या राधिका क्रिएशन्स या नावाने अॅक्टिंग स्कूल उभारले आहे. यामार्फत अनेक मुलामुलींना तिने अभिनयाचे धडे दिले आहेत. याशिवाय त्यांना घेऊन काही नाटकांचे सादरीकरण केले आहे.

वृत्तपत्रासाठी अनेकदा ती ब्लॉग रायटरची भूमिकादेखील बजावताना दिसली आहे.  राधिका आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू करत आहे. Twios या नावाने तिचा लहान मुलांचा कपड्यांचा ब्रँड आहे. ज्यात लहान मुला मुलींसाठी आकर्षक डिझाईनमध्ये बनवलेले कपडे खरेदी करता येतील.

Twiosintl या नावाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. यावर तुम्हाला तिच्या ब्रॅंडमध्ये काय काय समाविष्ट केले आहे याची यादी पाहता येईल. 

Web Title: Aai Kuthe Kay Karte Fame this actress started a new business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app